शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार कोविशिल्ड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 01:11 IST

डॉ. किरण पाटील यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : रायगड जिल्ह्यातील शनिवार १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी १ आणि पनवेल येथील २, अशा ४ केंद्राच्या माध्यमातून ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस दिली जाणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात शनिवारी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी १५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. किरण पाटील बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने उपस्थित होते. रायगड जिल्ह्याला १३ जानेवारी रोजी ‘कोविशिल्ड’ व्हॅक्सिनचे ९ हजार ५०० डोस प्राप्त झाले आहेत. १६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात होईल. अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, पनवेल तालुक्यातील एमजीएम मेडिकल कॉलेज व वायएमटी हॉस्पिटल अशा ४ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ४ केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर हळूहळू या लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार असल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार तसेच डोस दिल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला थांबवून ठेवले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कोविड अ‍ॅपवर नोंदकोविड अ‍ॅपवर रायगड जिल्ह्यातील ८ हजार २०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली. पहिल्या टप्प्यात गरोदर महिला, १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती, अ‍ॅलर्जिक रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Raigadरायगड