शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कर्नाळा अभयारण्यात प्राण्यांची संख्या वाढली कि कमी झाली? गणनेला सुरुवात

By वैभव गायकर | Updated: May 5, 2023 18:02 IST

बुद्धपौर्णिमेच्या दिवशी प्राण्यांच्या मोजणीला होणार प्रारंभ

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेल सारख्या निर्माण होत असलेल्या सिमेंटच्या जंगलाजवळ असलेल्या कर्नाळा अभयारण्यामध्ये वाढलेल्या मानवी हस्तक्षेपाचा प्राण्यांच्या संख्येवर काही परिणाम झाला आहे का, गेल्या वर्षभरात वन्य प्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली. अभयारण्यात नवीन कोणता प्राणी दाखल झाला आहे का? या सर्वांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत. दि. ५ रोजी बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने प्राणी गणनेला सुरुवात झाली आहे.

वन विभागातर्फे दर वर्षी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्यांची गणना केली जाते. यंदा 5 मे रोजी ही गणना सुरु झाली असून प्राणिप्रेमी रात्रभर पाणवठ्यावर बसून प्राण्यांच्या हालचाली टिपणार आहेत.याकरिता वनविभागासोबत वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संस्था एकत्रितपणे दि.5 आणि 6 रात्रीच्या वेळेला प्राण्यांच्या हालचाली टिपणार आहेत. याकरिता कर्नाळा अभयारण्यात तीन मचाण आणि ट्रॅक कॅमेरे बसविन्यात आले आहेत.20 पेक्षा जास्त जणांचे पथक प्राण्यांची गणना करणार आहे. पनवेलपासून अवघ्या काही कि.मी. अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. लाखो पर्यटक दरवर्षी या अभयारण्याला भेट देत असतात. सुमारे 12.155 चौरस किलोमीटरच्या परिसरात हे अभयारण्य वसले आहे. स्थानिक तसेच स्थलांतरित 147 प्रजातीचे पक्षी या ठिकाणी आहेत. यामध्ये 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित पक्षी आहेत. विविध प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास आहे.बिबटे,डुक्कर,रान मांजर,भेकर,खवल्या मांजर आदी याठिकाणी यापूर्वी पाहिले गेले आहेत.या प्राण्यांच्या सध्याची स्थिती काय आहे?याबाबत माहिती मिळणार आहे.पाणथळ्या शेजारी वनविभागाने निवडलेले कर्मचारी या भागावर लक्ष ठेवून असणार आहेत.काही ठिकाणी ट्रॅक कॅमे-यांची देखील याकरिता मदत घेतली जाणार आहे.

संस्थेचे स्वयंसेवक व कर्नाळा अभयारण्यातील वनविभागाचे कर्मचारी या गणनेसाठी प्राण्यांवर लक्ष ठेवून राहणार असल्याची माहिती कर्नाळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांनी दिली.कर्नाळा अभयारण्यातील एक गार्ड,एक सुरक्षा रक्षक आणि संस्थेचे सदस्य एकत्रित रात्रभर पाणवठ्याजवळ उभारल्या मचाणवर बसुन हि गणना करणार आहेत.

या ठिकाणी उभारल्या आहेत मचाण

कर्नाळा अभयारण्यात तीन मचाण उभारले असुन याठिकाणी बसुन हि गणना पार पडणार आहे.आपटा परिसर,मयूर रेस्ट हाऊस आणि डॉरमेन्ट्री या पाणवठ्याच्या ठिकाणी हि गणना पार पडणार आहे.याकरिता आधुनिक ट्रॅक कॅमेरे याठिकाणी लावले जाणार आहेत.

टॅग्स :panvelपनवेल