शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भालगाव घरकूल योजनेत भ्रष्टाचार

By admin | Updated: July 12, 2015 22:31 IST

तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायत हद्दीतील मंजूर घरकूल योजनेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तेथील ग्रामसेवकांची बदली करण्यात आली

रोहा : तालुक्यातील भालगाव ग्रामपंचायत हद्दीतील मंजूर घरकूल योजनेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तेथील ग्रामसेवकांची बदली करण्यात आली असून विस्तार अधिकारी यांच्यामार्फत या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी आर.एन. भामोदे यांनी दिली.भालगाव ग्रामपंचायतीतील मंजूर घरकुलांचे पैसे लाभार्थ्यांना अदा करताना एस. एल. पाटील यांनी लाभार्थ्यांच्या अशिक्षितपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत गैरव्यवहार केल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य विनायक धामणे यांनी गटविकास अधिकारी रोहा तसेच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे केली आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुलांची कामे अपूर्ण असताना देखील ग्रामसेवक यांनी पैसे अदा केले आहेत. यातील काही लाभार्थी मयत असताना देखील त्यांच्या नावाचे पैसे काढण्यात आले आहेत. तसेच जुन्या घरांना रंगरंगोटी करूनही त्यांचे पैसे अदा केले आहेत. धामणे यांनी पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना जागेवर नेऊन प्रत्यक्ष प्रकार निदर्शनास आणला होता. प्रत्येक घरकुलामागे २० ते ५० हजार रूपयांचा अपहार झाल्याचा धामणे यांचा आरोप आहे.