शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मिरची खरेदीसाठी स्कूलबसचा वापर, कर्जत पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 03:33 IST

ल ग्राहक मिरची खरेदीसाठी कर्जत शहरात सर्रास येत असल्याने कर्जत शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पनवेलमधून एक स्कूलबस मिरची खरेदीसाठी आली आणि कर्जतकर आक्रमक झाले.

 - विजय मांडे  कर्जत : पनवेल, नवी मुंबई रेड झोन आहे. दिवसेंदिवस येथील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या भागातील ग्राहक मिरची खरेदीसाठी कर्जत शहरात सर्रास येत असल्याने कर्जत शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पनवेलमधून एक स्कूलबस मिरची खरेदीसाठी आली आणि कर्जतकर आक्रमक झाले. त्यांनी स्कूलबसवर पाळत ठेवून पोलिसांशी संपर्क साधला. अखेर स्कूलबस पोलीस ठाण्यात नेण्यात आली. दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवून संध्याकाळी समज देऊन सोडण्यात आले. बाहेरील नागरिक, वाहनचालकांना कर्जतमध्ये बंदी करावी, अशी मागणी कर्जतकरांकडून होत आहे.कर्जतमध्ये चांगली मिरची मिळते म्हणून रायगड, ठाणे जिल्ह्यातील ग्राहक नेहमीच खरेदीसाठी कर्जतला येतात. सध्या पनवेल आणि नवी मुंबई रेड झोनमध्ये आहे. तरीही पहाटे ६ वाजल्यापासूनच पनवेल परिसरातील ग्राहक मिरची खरेदीसाठी सर्रास वाहने घेऊन येत आहेत. याबद्दल पोलिसांना दोष दिला जातो; परंतु पोलिसांचा डोळा चुकवून किंवा अत्यावश्यक सेवा असा फलक असलेले वाहन घेऊन ग्राहक येतात. त्यामुळे पोलिसांचा नाइलाज होतो. काही ग्राहक भिसेगाव मार्गे जुन्या एसटी स्टॅण्डपर्यंत वाहने आणून तेथे ठेवतात आणि रेल्वे ब्रिजवरून कर्जत बाजारपेठेत मिरची खरेदी करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेरील व्यक्तींना कर्जत शहरात प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी कर्जतकरांकडून होत आहे.शनिवारी एम एच ४६ एक्स २५३८ क्रमांकाची, नवीन पनवेल असे लिहिलेली स्कूलबस महावीरपेठेत आली. हे कर्जतकरांच्या निदर्शनास आले आणि ते आक्रमक झाले. पोलिसांशी संपर्क साधल्यावर शोधाशोध सुरू झाली. अर्ध्या तासानंतर स्कूलबसचा चालक आणि मिरची खरेदीदार तेथे आले. तेथे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, सुनील गोगटे, राहुल कुलकर्णी, समीर सोहनी आदीच्या तक्रारीनंतर स्कूलबस पोलीस ठाण्यात नेण्यात आली. पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी मिरची खरेदीदार आणि स्कूलबसचालकाला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून चांगलीच समज दिली आणि संध्याकाळी सोडून दिले.पनवेलहून येणारी वाहने भिसेगाव मार्गे जुन्या एसटी स्टॅण्डकडे येतात, त्यामुळे भिसेगावचा मार्ग बंद केला असून सर्व वाहने चारफाटा मार्गे जातील, अशी व्यवस्था केली आहे.- अरुण भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कर्जत

टॅग्स :Karjatकर्जत