शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: पनवेल, उरणमध्ये कोरोनाचे सहा रुग्ण वाढले; रायगड मधील रुग्णांची संख्या 28

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 19:31 IST

या नव्या रुग्णांमध्ये खारघर मधील दोन, कळंबोली व तळोजे मधील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

वैभव गायकर 

पनवेल :पनवेल , उरण याठिकाणी रविवारी नव्याने सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 28 वर पोहचला आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 4 तर उरण मध्ये 2 अशा सहा रुग्णांची कोविड 19 टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे. 

या नव्या रुग्णांमध्ये खारघर मधील दोन, कळंबोली व तळोजे मधील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. यापैकी खारघर शहरातील नागरिकाचा परदेशी प्रवासाचा इतिहास आहे.22 व्या दिवशी  त्याची कोविड 19 टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे.त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खारघर व कळंबोली मधील उर्वरित दोन रुग्णांवर अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. यापैकी खारघर मधील रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. नवी मुंबई मधील एका रुग्णालयात  काम करणारा तरुणाची देखील कोविड 19 टेस्ट पॉसिटीव्ह निघाली आहे. हा तळोजा वसाहती मधील रहिवासी आहे. हा रुग्ण बेलापूर मध्येच कोरंटाईन होता.पनवेल परिसरात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.उरण मध्ये नव्याने दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एक तरुण  व एक सीआयएसएफ जवानाच्या पत्नीचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व प्रांत अधिकारी हे युद्धपातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे अवाहन हे अधिकारी करीत आहेत. चार  रुग्ण वाढल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या 22 झाली आहे. तर रायगड जिल्ह्यातील उरण ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ६ झाली आहे  आहे.

पनवेल मध्ये अद्याप चाचणी केलेल्या 325 नागरिकांचे कोविड 19 टेस्ट करण्यात आली आहे.यापैकी 270 नागरिकांची टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.विशेष म्हणजे पनवेल परिसरातील होम कोरंटाईन केलेल्या नागरिकांची संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. पनवेल परिसरात सध्याच्या घडीला होम कोरंटाईन केलेल्या नागरिकांची संख्या 1700 झाली आहे. 14 दिवसांचा होम कोरंटाईनचा कार्यकाळ सुमारे 28 दिवसांवर करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला असून होम कोरंटाईन केलेल्या नागरिकांनी 28 दिवस घरीच थांबावे असे अवाहन आयुक्त देशमुख यांनी केले आहे.  

कोरोना बाधित रुग्ण -28(पनवेल 22 + रायगड ग्रामीण 6)

खारघर -6

कामोठे -3

कळंबोली -12

तळोजे  -1

रायगड  ग्रामीण -6

बरे झालेले रुग्ण -4

मृत्यू -1

होम कोरंटाईन -1700

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या