शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: अलिबागमध्ये नवीन सात रुग्ण; बाधितांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 23:28 IST

नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

अलिबाग : अलिबागमध्ये रविवारी एकाच दिवशी सात नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मोठे शहापूर येथील जेएसडब्ल्यू कंपनीचा कंत्राटी कामगार, चिंचवली येथील एक गृहिणी असे २ रुग्ण, तर बेलकडे गावात दोन, नेहुली-खंडाळे व मांडवी मोहल्ला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.मोठे शहापूर येथील एका ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. जेएसडब्ल्यू कंपनी, वडखळ येथे कंत्राटी कामगार असलेल्या या तरुणाची स्वॅब टेस्ट रविवारी पॉझिटिव्ह आली आहे. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. मोठे शहापूर येथील एका ४८ वर्षीय महिलेलाही कोरोना झाला आहे. ही महिला बोरीवली, मुंबई येथून गावी आली होती. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. तर भुनेश्वर चिंचवळी येथील ४८ वर्षीय महिला बोरीवली, मुंबई येथून गावी आली होती. तिच्यावर अलिबाग जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.अलिबागमधील मांडवी मोहल्ला येथेही एका ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. इस्टेट एजंट असलेला हा रुग्ण मुंब्रा, ठाणे येथून अलिबागला आला होता. त्यास जिल्हा शासकीय रु ग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय नेहुली खंडाळे येथेही एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नोंदविण्यात आला आहे. ५८ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.माणगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला बळीमाणगाव : तालुक्यातील इंदापूर येथील ५० वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णाचा शुक्रवार १२ जून रोजी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या बळीची नोंद प्रशासनाकडे केली आहे. शनिवार १३ जून रोजी माणगावमध्ये एक पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला असून तालुक्यात सध्या सात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे यांनी दिली.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून माणगाव तालुक्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील जवळपास २४ गावांतून आजपर्यंत ५४ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी इंदापूर येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर ४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.माणगाव तालुक्यात लॉकडाऊन शिथिल झाल्याने नागरिक बेशिस्त व निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. दुकानासमोर तसेच बँका, एटीएम यांच्यासमोर फार मोठी गर्दी होताना निदर्शनास येत आहे. कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने प्रशासन वेळोवेळी जनतेला सतर्क व जागरूक राहण्याच्या सूचना देत आहे, याचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी केले आहे.पनवेलमध्ये ५७ नवे रुग्णपनवेलमध्ये रविवारी तब्बल ५७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. तर ४३ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या