शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Raigad: परराज्यातील नागरिकांच्या दाखल्यांसाठी रांगा; अलिबाग जिल्हा रुग्णालयात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 01:59 IST

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; पोलिसांची दमछाक

अलिबाग : शासनाने परराज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात, गावात पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार परराज्यातील नागरिक हे आपल्या गावी जायला मिळणार म्हणून आनंदित झाल्याने गावी जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासणीसाठी गर्दी करू लागले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी दाखला घेण्यासाठी नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्या. या वेळी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

रुग्णालय तसेच पोलीस सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्याच्या सूचना देत असूनही नागरिक नियम डावलताना दिसत आहेत. काही करून आपल्या राज्यात, आपल्या गावी जायचे असा चंग रायगड जिल्ह्यात सध्या वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय मजुरांनी बांधला आहे. आपल्या हक्काच्या घरी पोहोचण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. सकाळपासूनच कागदपत्र जमवणे, नोंदणी करणे, त्याचबरोबर वैद्यकीय चाचणी करून घेणे यासाठी झेरॉक्स दुकान, सायबर कॅफे, सरकारी रुग्णालये या ठिकाणी भल्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने अधूनमधून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे.

मंगळवारी सकाळपासूनच अलिबागच्या जिल्हा रूग्णालयासमोर तीन हजार मजूर रांगेत उभे होते. परराज्यातील नागरिकांनी सोडण्यासाठी जिल्हा प्रसासनाच्या विविध हालचाली सुरू असताना नागरिकांच्या अतिउत्साहाचा ताण पोलीस व रुग्णालय प्रशासनाला सहन करावा लागत आहे.उरणमध्ये आरोग्य दाखल्यासाठी झुंबड : आरोग्य दाखल्यासाठी उरणमध्ये कामानिमित्त आलेल्या परप्रांतीयांनी रुग्णालयांसमोर गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. नागरिक तासन्तास रांगेत उभे असून गर्दीला आवर घालताना प्रशासनाची भंबेरी उडत आहे. राज्य शासनाने परप्रांतीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा आॅनलाइन फॉर्म भरून करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येकाला आरोग्य तपासणीच्या दाखल्याची गरज आहे. यामुळे शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयासह शहरातील पालवी रुग्णालय व इतर ठिकाणी रुग्णालयासमोर कामगारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला होता. गर्दीवर नियंत्रण आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस