शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: शहरात कोरोनाची लक्षणे असलेले तीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 23:59 IST

२२,६०० नागरिकांची तपासणी; कर्जतमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजना यशस्वी

कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना येथील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. शहरात राहणाऱ्या सर्व २२,६०० नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाने केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या योजनेमध्ये कर्जतकरांची आरोग्य तपासणी केली असता, केवळ तीन नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत, तर एकही कोरोना झालेला रुग्ण या योजनेत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत असताना आढळून आला नाही.कर्जत शहरात सरकारने जाहीर केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेचे काम पालिकेने सर्व प्रभागात एकाच वेळी सुरू केले. त्यासाठी १२ टीम कर्जत शहर, तसेच दहिवली, भिसेगाव, गुंडगे, मुद्रे बुद्रुक, मुद्रे खुर्द आणि आकुर्ले या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत होत्या. त्यात १५ दिवसांत पालिकेच्या हद्दीत असलेल्या सर्व ६,४८७ घरी जाऊन या आरोग्य पथकाने तपासणी मोहीम राबविली. त्यात या योजनेच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक नागरिकांच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण मोजण्याचे काम, तसेच थर्मल स्कॅनिंग केले जात होते. १२ टीमकडून सर्वेक्षण सुरू असताना, पालिकेच्या अध्यक्षा सुवर्णा जोशी या प्रत्येक टीमला भेटून त्यांना कोणी नागरिक सर्वेक्षण करायला आडकाठी करीत असेल, तर त्यांची समजूत काढण्याचे काम जोशी स्वत: करीत होत्या. पालिकेचे सर्व १७ नगरसेवक-नगरसेविका आणि दोन स्वीकृत नगरसेवक हेही आरोग्य पथकाबरोबर राहून सर्वेक्षण करून घेण्यासाठी पुढाकार घेत होते.१५ दिवसांनी पुन्हा मोहीमकर्जत शहरात नागरिकांनी आरोग्य पथकाला केलेल्या सहकार्य, यामुळे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान यशस्वी झाले आहे. पालिकेच्या हद्दीत राहणाºया सर्व २२,८०० नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे, परंतु आजही नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर प्रवास करणारे नागरिक यांनी घराबाहेर पडताना, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. अशी सूचना पालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी केली आहे. आता पुन्हा १५ दिवसांनी आरोग्य पथक घरोघरी जाऊन पुन्हा एकदा नागरिकांची माहिती घेणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या