शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Raigad : मुंबईतून गावी आलेल्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 00:13 IST

या दाम्पत्यावर मुंबईतील सोमय्या रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते.

महाड : मुंबईत गर्भवती पत्नीला कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार न घेता तसेच होम क्वारंटाइन न करता मुंबईतून दुचाकीने महाड तालुक्यातील करमर हे गाव गाठणाऱ्या या दाम्पत्यावर अखेर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी आदेशाचे उल्लंघन कोरोना व साथरोग अधिनियमानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.हे दाम्पत्य महाड तालुक्यातील करमर येथील असून सध्या ते मुंबईत वास्तव्यास आहेत. या दाम्पत्यावर मुंबईतील सोमय्या रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते. त्यांना अधिक उपचारांची गरज असल्याने १८ मेला सोमय्या रुग्णालयातून के.ई.एम, नायर किंवा सायन हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घ्यावेत, असे सांगत त्यांना सोमय्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता; परंतु या दाम्पत्याने तसे न करता दुचाकीने मुंबईतून थेट आपले महाड तालुक्यातील गाव गाठले. हा प्रकार करमर ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर आरोग्य व पोलीस यंत्रणा जागी झाली. पती व गर्भवती पत्नीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता या दोघांना महाड ग्रामीण रुग्णालयाच्या कोरोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड