शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल, बाहेर नातेवाईक बेहाल, रायगडमध्ये कोविड केअर सेंटरमध्ये प्राथमिक सोईसुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 00:03 IST

CoronaVirus News : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. परंतु त्यांच्यासोबत नातेवाइकांचेही हाल होत आहेत.

- निखिल म्हात्रे

अलिबाग : मागील २० दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढल्याने रुग्णांना आरोग्य सेवा द्यायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याने अलिबाग येथील जिजामाता कोविड केअर सेंटर सुरू  केले. मात्र येथे पिण्याच्या पाण्यासह इतर प्राथमिक सोईसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. परंतु त्यांच्यासोबत नातेवाइकांचेही हाल होत आहेत. बाहेर त्यांना कुणीच मदत करायला तयार नाही. ‘दूर राहा, दूर राहा’ फक्त एवढेच ऐकायला येत आहे. रुग्णांसोबत आलेल्या इतर नातेवाइकांची जेवणाची सोय नसल्याने त्यांना उपाशी राहावे लागते. चहा, पाणी व नाश्ता मिळणे कठीण झाले आहे. जिल्हा रुग्णालयात एका बाजूला आयसोलेशन वाॅर्ड तर याच रुग्णालयाच्या दुसऱ्या वॉर्डात इतर आजारांचे रुग्ण असल्याने त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाइकांना वॉर्डाच्या बाहेर राहावे लागत आहे. यामुळे रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाइकांना रात्र जागून काढावी लागत आहे. खाण्या-पिण्यासाठी खिशात पैसे असले तरी  बाहेर एकही दुकान नाही. 

नातेवाइकांकडे जाता येत नाही आणि बाहेर काही मिळत नाही रुग्ण ॲडमिट असेल तर त्याचे नातेवाईक केंद्राच्या बाहेर असतात. रुग्णांना काही गरज भासेल म्हणून ते तेथेच थांबतात. परंतु, त्यांची मोठी अडचण होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांच्या काळजीपोटी ना ते घरी जाऊ शकत, ना ब्रेक द चेनमुळे त्यांना कोणतेही साहित्य मिळत. त्यामुळे रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाइकांचे मोठे हाल होत आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयात आम्ही आमच्या रुग्णाच्या उपचारासाठी आलोय. आतमध्ये आमच्या रुग्णाकडे कुणी लक्ष देत नाही तर बाहेर आम्हालाही त्रास होतोय. खिशात पैसे असूनही भूक शमविता येत नाही. कोरोनाच्या दहशतीने दुकाने बंद आहेत. खर्च करण्याची मानसिकता असली तरी एकही दुकान सुरू नाही.- रुग्णाचा नातेवाईक

माझा मोठा भाऊ रुग्णालयात आहे. त्याची तब्येत कशी आहे, हे सांगणारे इथे कुणीच नाही. त्याला जेवण वेळेवर मिळते की नाही, हेसुद्धा कळत नाही. त्यामुळे व्हिडीओ काॅलद्वारे रुग्णाला दाखविण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी.- रुग्णाचा भाऊ

कोरोनामुळे परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की कसल्याही आजाराचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये जाण्यास निघत नाही. हॉस्पिटलमध्ये गेल्यास परत घरी जाणार की नाही, असे रुग्णांना वाटते. रुग्णांच्या सोबत हिंमत करून आलेल्या त्यांच्या नातेवाइकांनाही त्रास सहन करावा लागतो. रुग्णालयाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी त्रासच आहे.- रुग्णाचा नातेवाईक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसalibaugअलिबाग