शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कर्जतमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:36 IST

पोशिर येथील तरुणाचा मृत्यू

कर्जत : तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण थांबत नाही असे दिसून येत आहे. कर्जत शहरात एका महिलेचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून पोशिर गावातील ३९ वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी घेतला आहे. कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४६ झाली असून त्यात पाच जणांचे बळी गेले आहेत. १६ जणांवर उपचार सुरू आहेत तर २५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.सावळे गावातील मारामारीप्रकरणी अटक असलेल्या आरोपीच्या संपर्कात आल्याने ३२ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल १५ जून रोजी पॉझिटिव्ह आला आहे. आरोपी तरुणामुळे कर्जत शहरात दोन पोलीस कर्मचारी, एक पोलीस अधिकारी आणि एका पोलिसाची पत्नी अशा चार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कर्जत डेक्कन जिमखाना, ज्ञानदीप सोसायटी आणि डी मार्ट परिसर हे कंटेनमेंट झोन बनले आहेत. या रुग्णामुळे कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७ वर पोहोचली आहे. त्यात कर्जत तालुक्यातील कर्जत, माथेरान, नेरळ या शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील गावात कोरोना पोहोचला आहे.पोशिर येथील ३९ वर्षीय तरुणाचा सोमवारी मृत्यू झाला असून नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीत नोकरी करणाºया तरुणाला मित्राकडून लागण झाली होती. त्याच्या टेस्टचे अहवाल १३ जून रोजी रात्री पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर अल्पावधीत पोशिर गावातील तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या पश्चात आईवडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार असून एकुलता एक आणि कर्ता मुलगा गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.उरणमध्ये १६६ रु ग्ण ठणठणीत; घरी परतलेउरण : उरणमधून कोरोनाबाधित १८२ रुग्णांपैकी आजपर्यंत १६६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित १५ पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उरण परिसरात आजतागायत ४३३ नागरिकांच्या केलेल्या चाचणीतून १८२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यापैकी १६६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या