शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: मिनी लाॅकडाऊनमुळे आता महिनाभर दाढी-कटिंग करावी लागणार घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:17 IST

आठ हजार सलून चालकांचा रोजच्या जगण्याचा प्रश्न गंभीर

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : टाळेबंदीमुळे अनेक छोट्या- मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात न्हावी समाजातील सलून व्यावसायिक आणि कारागिरांना दुकाने बंद असल्याने कामच उरले नाही. त्यामुळे आठ हजारांवर सलून दुकानदार व कारागिरांसमोर रोजच्या जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एकमेकांच्या संपर्कातून मोठ्या प्रमाणात होतो. त्यात सलूनच्या माध्यमातून याचा संसर्ग अधिक होण्याच्या संशयही आहे. टाळेबंदीत सलून बंद ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात छोटी-मोठी आठ हजार दुकाने असून, त्यात १५ हजारांवर कारागीर कार्यरत आहेत. यात काही मोठी दुकानेही व्यावसायिकांची असली तरी त्यात काम करणाऱ्या कारागिरांची संख्या ही जास्त आहे. मोठ्या सलूनमध्ये दोन ते पाच कारागीर कामावर असतात. ज्यांचे पोट हे रोजच्या मिळकतीवर असते. मात्र, आता कामच उरले नसल्याने त्यांची परिस्थिती बेताची झाली आहे.अनेक सलून दुकाने ही भाड्याच्या जागेत आहेत. अनेकांचे ठेलेही भाड्याच्या जागेवर आहेत. यात ठेल्याचे भाडे ३ हजार ते मोठ्या दुकानांचे भाडे १० हजारांवर आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने भाडे थकले आहे. 

सलून कामगारांसाठी सरकारने घर भाड्यात सूट द्यावी, वसुलीची सक्ती करून नये, असे आवाहन केले आहे. मात्र घरमालक पैशासाठी विचारणा करीत असल्याने कामच नसल्याने भाडे द्यायचे कसे, अशा पेचात छोटे दुकानदार सापडले आहेत.    - समिर शिर्के

अनेक दुकानांमध्ये असलेले कारागीर हे बाहेर राज्यातील किंवा विदर्भाच्या विविध जिल्ह्यतून आलेले आहेत. यातील अनेकांकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना स्वस्त धान्याचा लाभही मिळत नाही. त्यामुळे अशा कारागिरांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली असून प्रशासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.    - सतीश शिंदे 

एक तर मागील वर्षभर आमची दुकाने कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे बंद होती. तशीच यावर्षी सुद्धा दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आता संसार चालवायचा कसा, असा प्रश्न उभा राहिला आहे. आता तरी या लाॅकडाऊनमध्ये आमची दुकाने सुरू ठेवण्यास सूट मिळावी.    - नितीश म्हात्रे

अनेक न्हावी हे मिळेल त्या रिकाम्या जागेवर कच्चे दुकान, ठेला उभारून काम करतात. काही तर फुटपाथवर एक छोटी खुर्ची टाकून रोजच्या मिळकतीतून परिवाराचा गाडा चालवतात. मात्र, टाळेबंदीने कुणालाच काम नसल्याने विस्कटलेली परिस्थिती कशी सावरायची, असा प्रश्न पडला आहे.    - राजू जाधव ( उपाध्यक्ष, नाभिक संघटना अलिबाग)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या