शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

CoronaVirus Lockdown News: जिल्ह्यात समुद्रकिनारा पुन्हा सुनासुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:13 IST

मिनी लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यावसायिकांना फटका

अलिबाग : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा केल्याने पुन्हा एकदा समुद्र, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन बंद झाले आहे. त्यामुळे हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांचे पुन्हा नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. मिनी लॉकडाऊन जाहीर झाल्याने समुद्रकिनारे पुन्हा ओस पडू लागल्याने, समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्यांना याचा फटका बसला आहे.रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत सहा हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार ७९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात वर्षभरात ७६ हजार ९९३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती, यापैकी ६९ हजार ५०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.व्यावसायिक चिंतीतमार्च २०२०ला कोरोनामुळे सहा महिने लॉकडाऊन झाले. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली आणि हॉटेल व्यवसाय पुन्हा सुरू झाले. मार्च २०२१ला पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने रायगडात रुग्णंसख्या वाढू लागली व पर्यटकांची संख्या कमी होऊ लागली. त्यामुळे हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकही अडचणीत येऊ लागले. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिनी लॉकडाऊनची घोषणा केल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ लॉकडाऊनराज्यासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण दोन दिवस शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. यावेळी सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने दोन दिवस जिल्ह्यातील रस्ते निर्मनुष्य होणार आहेत. पर्यटनस्थळे, समुद्रकिनारे, धार्मिक, ऐतिहासिक स्थळेही बंद राहणार असल्याने पर्यटकही येणार नाहीत. याचा फटका हॉटेल, लॉजिंग व्यावसायिकांना बसणार आहे.श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन कोलमडलेदिघी : राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन घोषित केल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत. गेल्या मार्चमधील पूर्णतः लॉकडाऊननंतर निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला होता. या सर्व बाजूने कोलमडलेले जनजीवन ‘मिशन बिगीन’च्या माध्यमातून पर्यटनाला मुभा दिल्याने सावरत असतानाच, मिनी लॉकडाऊनमधील शनिवार, रविवार या दोन दिवसांतील पूर्णत: टाळेबंदीने येथील व्यावसायिकांचा रोजगार हिरावला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनचा मोठा फटका येथील हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. इतर जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकणातील पर्यटनातून मिळणाऱ्या रोजगारांवर गदा आल्याचे येथील व्यावसायिक सांगतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या