शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गेल्या नऊ महिन्यांत कोरोनाचा कहर; रायगड जिल्ह्यात ५१ हजारांहून अधिक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:19 IST

४५ ठिकाणी उपचार, जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून ३,८३७ कोविड सेंटर आहेत.

निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोनाने गेल्या नऊ महिन्यांत कहर केला होता. रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या नऊ महिन्यांत रायगड जिल्ह्यात ५१ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. यामधून ४७ हजार ३२९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढत आलेख लक्षात घेऊन जिल्ह्यात ४५ ठिकाणी उपचार यंत्रणा सज्ज ठेवली आहे. या कोविड सेंटरमधून ५ हजार १४४ बेड तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ऑक्सिजन सपोर्टेड बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्स सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून ३,८३७ कोविड सेंटर आहेत. यामध्ये १६८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के कोरोना पॅझिटिव्ह रुग्ण येत असले, तरी कोरोनापासून मुक्त होणाऱ्या या रुग्णांचे प्रमाण ९२ टक्के आहे.

५ मार्चपासून आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५१ हजार ४१५ रुग्णांची संख्या पार केली आहे. कोरोनामुळे रायगड जिल्ह्यात १,४५५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात असणा‍ऱ्या रुग्णांची संख्या २ हजार ६३१ आहे. या व्यक्तींना अधिक उपचारासाठी आणि देखरेखीसाठी जिल्ह्यात ४५ कोविड सेंटर उभारले आहेत. यामध्ये कोविड केअर सेंटर १८, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर २५, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल २ आहेत. रुग्णालयांमध्ये ५ हजार १४४ बेड्सची निर्मिती करण्यात आली आहे. या बेड्समध्ये ऑक्सिजन सपोर्टेड १,१९१ आणि आयसीयू बेड ३१३ आहेत. या सर्व कोविड सेंटरमध्ये ६४ व्हेंटिलेटर्स सज्ज  आहेत. बाधित किंवा संशयित असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी आणणे आणि त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईत नेणे, यासाठी १०३ रुग्णवाहिका सज्ज आहेत.

स्वत:च्या आरोग्याविषयी आता नागरीकही सजग झाले आहेत. सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला नागरिकांतून प्रतिसाद मिळत आहे. आमचे कर्मचारी गावागावांमध्ये जाऊन नागरिकांची माहीती घेत आहेत. कुणा नागरिकास सर्दी, ताप, खोकला असेल, तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.  - सुहास माने, जिल्हा शल्य चिकीत्सक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या