शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine: मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला ‘खो’; आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 02:30 IST

सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात १७ लसीकरण केंद्रांवर  लसीकरण केले जात आहे. यापैकी ६ शासकीय तर ११ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे.

वैभव गायकरपनवेल : कोरोनाची लस १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना दिली जाणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडण्याची शक्यता आहे. मागणीएवढा लसींचा पुरवठा न झाल्यास लसीकरणात खोडा पडण्याची शक्यता आहे. याकरिता पालिका प्रशासनाला तशी यंत्रणा उभारावी लागणार आहे. यापूर्वी सुरू झालेल्या लसीकरणात अनेक वेळा तांत्रिक तसेच साठ्याच्या अभावामुळे अनेकांना भरउन्हात रिकाम्या हाती परतावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करणे गरजेचे आहे. 

सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात १७ लसीकरण केंद्रांवर  लसीकरण केले जात आहे. यापैकी ६ शासकीय तर ११ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. मात्र लसीकरण सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयात वेळेत लसींचा पुरवठा होत नसल्याने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना वारंवार खाजगी रुग्णालयांत खेटे मारावे लागत आहेत. आता ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याने याकरिता केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे. यामध्ये आणखी रुग्णालये वाढविल्यास लसीकरण मोहीम अधिक सोपी होणार आहे. 

४५ वर्षांवरील दीड लाख नागरिकांना करावे लागणार लसीकरण  पालिका क्षेत्रात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात साधारण ९ लाख लोकसंख्या आहे. या लोकसंख्येपैकी अंदाजे दीड लाख लोकसंख्या ४५ वर्षांवरील नागरिकांची आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी नागरिकांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. 

सध्या मागणी किती, साठा किती मिळतो?सध्या दररोज किमान २००० लसींची मागणी आहे. मात्र यापैकी कोविशिल्ड लस पालिकेकडे उपलब्ध होत आहे. कोव्हॅक्सिनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी लाभार्थ्यांना लसीकरणाचा दुसरा डोस मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. 

सध्या १७ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी आणखी खाजगी रुग्णालयांची यादी शासनाकडे पाठविली आहे. १७ केंद्रांशिवाय सोमवारी आणखी तीन खाजगी रुग्णालये व पनवेल शहरातील उरण नाका येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. - डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस