शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:21 IST

बहुतांश लसीकरण केंद्रे शुक्रवारी सायंकाळपर्यंत बंद हाेण्याची चिन्हे; काही ठिकाणी नागरिक रिकाम्या हाती परतले

- निखिल म्हात्रेअलिबाग : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत असले तरी जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद पडणार आहेत. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये काही प्रमाणातच साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे लसीकरणाला नागरिकांनी फारसा उत्साह दाखवल्याचे दिसून आले नाही. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य लसीकरण केंद्राची झाली हाेती. काही ठिकाणी तर नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले आहे.रायगड जिल्ह्यात सुरुवातीला कोव्हॅक्सिन आणि नंतर कोविशिल्ड अशा दोन्ही प्रकारच्या लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यानंतर अगदी सुरुवातीला या कोविड लसीकरण मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर मात्र या लसीकरणाबाबत लोकांमध्ये विश्‍वास वाढल्याने प्रतिसाद वाढला. लसीच्या मागणीप्रमाणे पुरवठा वाढला होता; परंतु लस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने लसीकरण केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली.जिल्ह्यात एकूण ८४ लसीकरण केंद्र असून त्यापैकी ५९ लसीकरण केंद्र सुरू आहेत तर २५ केंद्र लसीच्या कमतरतेमुळे बंद आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३३ हजार १०९ जणांचे सलीकरण पूर्ण झाले आहे. तर ३ हजार ७८० डोस शिल्लक आहेत. मात्र, ते ही आजच्या लसीकरणात संपतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली. लसीकरणाचा वेगही मंदावला. त्यामुळे सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर मिळणारी लस लगेच मिळेनाशी झाली. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी पुढील तारीख मिळू लागली.सरकार, प्रशासन सतर्क जिल्ह्यात काेराेनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डाेके वर काढले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ३५ हजार ६७० आराेग्यसेवक आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली आहे. ४५ वर्षांच्या पुढे असणारे २३ हजार ९५७ नागरिक आहेत. ५५ हजार ७३१ ज्येष्ठ नागरिकांनीही लस घेतली आहे. जिल्हा साठवण केंद्रातील लसीचे वितरण झाले आहे. मिळालेल्या अहवालानुसार अनेक लसीकरण केंद्रांवरील लस संपली आहे. जेथे शिल्लक आहे तेथे एक दिवस पुरेल इतकाच साठा आहे. आम्ही नवीन लसीची मागणी केली आहे. ती उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण वेगाने सुरू होईल.- डॉ. गजानन गुंजकर,जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण२५ केंद्रे बंद आराेग्य विभागाने सुरुवातीला ८० केंद्रांपैकी ५० केंद्रे बंद झाल्याचे सांगितले हाेते. त्यानंतर आज जिल्हा प्रशासनाने नव्याने आकडेवारी जाहीर करत फक्त २५ केंद्र बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे समन्वयाचा अभाव असल्याचे समाेर आले आहे. मात्र, विश्र्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील लस संपली असल्याचे सांगितले आहे.ग्रामीण भागात तुटवडाजिल्हा मुख्य लस साठवण केंद्रातील लसींचा साठा संपला आहे. अनेक केंद्रांवरील विशेषतः ग्रामीण भागातील लसीकरण लसीअभावी थांबवण्यात आले आहे. तर ज्या केंद्रांवर लस शिल्लक आहे तेथे एक ते दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यासाठी आतापर्यंत १ लाख ३९ हजार १०९ जणांना लस देण्यात आली. तर १३ हजार ५८९ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. शहरी भागात बऱ्यापैकी लसीकरण झाले असले तरी ग्रामीण रायगडमधील नागरिक अजूनही लसीच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस