शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने अडविली पेणमधील गणपती बाप्पांची परदेशवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:43 IST

मूर्तिकारांना चिंता; मागणी नोंदविलेल्या हजारो ऑर्डर तयार

पेण : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशातील टाळेबंदीचा फटका पेणमधील मूर्तिकारांना बसला आहे. परदेशातील गणेशभक्तांनी मागणी केलेल्या तब्बल २५ ते ३० हजार गणेशमूर्ती मॉरिशस, थायलंड, मलेशिया, ऑस्टेलिया, यूरोप, अमेरिका या खंडांतील देशात असलेले कोरोना प्रतिबंधक नियम व टाळेबंदीमुळे या तयार ॉऑर्डर कशा पोहोचतील या विवंचनेत पेणचे मूर्तिकार सापडले आहेत. गतवर्षीप्रमाणेच या वर्षातसुध्दा कोरोनाचा अडसर निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणू महामारीने बाप्पांची परदेशवारी अडविल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी सांगितले. दरवर्षी मान्सून हंगामाच्या अगोदर साधारणपणे​ मार्च, एप्रिल, मे अखेरपर्यंत ७० ते ८० दिवसांच्या कालावधीत परदेशात बाप्पांच्या प्रदेशवारीचा कालावधी असतो. जून उजाडेपर्यंत समुद्रमार्गे या ऑर्डर जुलै महिन्यात मागणी केलेल्या देशांमध्ये सुखरूप पोहोच होत असतात. सध्या पेणमधील मागणी केलेल्या प्रत्येक गणेशमूर्ती कारखान्यात तयार असून परदेशातील टाळेबंदी उठताक्षणी मूर्तींनी भरलेले कंटेनर बाप्पांच्या परदेश वारीला कधी एकदा ग्रीन सीग्नल मिळतो याकडे मूर्तिकारांना प्रतीक्षा करावी लागते आहे. २०२०वर्षात मूर्तिकारांना नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळ, कोरोना या आलेल्या संकटाला सामोरे जात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. तशीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवल्यास मोठ्या अर्थिक संकटाची चाहूल सध्याची परिस्थिती पाहता दिसत आहे. राज्यातसुध्दा कोरोनाची दुसरी लाट आल्याने सध्या मूर्तिकारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया या खंडातील देशात कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा पडला आहे. त्यामुळे सर्व संकटांचे निवारण करणाऱ्या बाप्पालासुध्दा कोरोना महामारी चा अडसर आल्याने बाप्पाची परदेश वारी थांबली आहे.