शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांचे आंदोलन; महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेतील कर्मचा-यांचे प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 03:02 IST

महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेतील कर्मचा-यांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. सरकारने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका-यांना दिले आहे तर दुसरीकडे रायगड जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

अलिबाग : महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेतील कर्मचाºयांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. सरकारने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाºयांना दिले आहे तर दुसरीकडे रायगड जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या उपोषणाला अधिक धार आली आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही या मुद्यावर आंदोलक ठाम असल्याने पहिल्याच दिवशी आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आंदोलनामध्ये राज्यातील ७५०, तर जिल्ह्यातील २४ कर्मचाºयांचा समावेश आहे. आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सुमारे १०५ कोटी ३३ लाख रुपयांच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहेत. योजना यशस्वी करण्यासाठी सरकारने कंत्राटी कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. कंत्राटी कर्मचाºयांना अद्यापही नियमित केलेले नाही. कर्मचाºयांना नियमित करण्यात येत नसल्यामुळे ते राजीनामा देत आहेत. त्यामुळे कर्मचाºयांची संख्या कमी होत आहे. कर्मचाºयांचे वय वाढत असल्यामुळे सरकारी नोकरीमध्ये जाण्याला निर्बंध येत आहेत. वाढत्या महागाईमुळे देण्यात येणारे मानधन अतिशय तुटपुंजे आहे. तसेच कामे सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनाने जावे लागते, परंतु पेट्रोलचे दरही वाढतच आहेत. त्यामुळे तेही परवडत नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. वाहन चालकांना मिळणारे मानधन हे नियमित वाहन चालकांना मिळणाºया वेतनाच्या २५ टक्केही देण्यात येत नसल्याची खंत कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे. कर्मचाºयांना विमा संरक्षणही देण्यात येत नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. मागण्यांबाबत सरकारकडे वेळोवेळी दाद मागितली, मात्र सरकार कंत्राटी कर्मचाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची संस्थेची धारणा झाली आहे.आंदोलकांनी पुकारलेले आंदोलन हे बेकायदेशीर असल्याने आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करावी. त्यांना आंदोलन करण्यापासून रोखावे आणि सुरु असलेली कामे सुरळीत सुरु कशी राहतील याकडे लक्ष द्यावे असे सरकारने मुख्य अभियंता आाणि कार्यकारी अभियंता यांना लेखी कळवले आहे. सरकारचे हे कृत्य म्हणजे आंदोलकांचे आंदोलन चिरडून टाकण्याचाच प्रकार आहे. त्यामुळेच सरकारने असे धमकी देणारे पत्रक काढले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.काम बंद आंदोलनामुळे विविध योजनांची कामे ठप्प होण्याची शक्यतारायगड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची (सन २०१२-१३ आणि २०१७-१८) १३ कोटी पाच लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची (सन २०१६-१७) ४२ कोटी १५ लाख तसेच (सन २०१७-१८) ४९ कोटी ६८ लाख रुपयांची विकासकामे होत आहेत. कंत्राटी कर्मचारी उपोषणामध्ये सहभागी झाले तर अशा एकूण १०५ कोटी ३३ लाख रुपयांची कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Raigadरायगड