शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिडाच्या बोटीची वाहतूक पूर्ववत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:57 IST

संघटनांमधील वादामुळे जंजिरामधील शिडाच्या बोटीची वाहतूक १५ दिवसांपासून ठप्प होती. यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. पर्यटकांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी दोन्ही संघटनांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे.

- संजय कारंडेमुरुड जंजिरा -  संघटनांमधील वादामुळे जंजिरामधील शिडाच्या बोटीची वाहतूक १५ दिवसांपासून ठप्प होती. यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. पर्यटकांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी दोन्ही संघटनांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे.जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. समुद्रामधील हा किल्ला अजिंक्य समजला जात होता. किल्ल्याची अभेद्य तटबंदी, समुद्रात असूनही किल्ल्यावर असणारे गोड्या पाण्याचे तलाव यामुळे पर्यटकांची पसंती या ठिकाणाला मिळत असते. जंजिरावरून किल्ल्याकडे जाण्यासाठी शिडाच्या बोटीचा उपयोग करावा लागतो. वेलकम सोसायटी व जंजिरा पर्यटक सोसायटीच्या वादामुळे मागील १५ दिवसांपासून शिडाच्या बोटीची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. कोणाच्या किती बोटी किल्ल्यावर सोडायच्या, यावरून मतभेद निर्माण झाले होते. यावर तोडगा निघत नसल्याने तब्बल १५ दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. परीक्षा संपत आल्याने जंजिरा पाहण्यासाठी येणाºया नागरिकांची संख्या वाढत असून, शिडाच्या बोटींची वाहतूक बंद असल्याने पर्यटकांना निराश होऊन परत जावे लागत होते. अनेक पर्यटकांनीही वाहतूक पूर्ववत सुरू व्हावी, अशी मागणी केली होती. अखेर दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. पर्यटकांना शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ल्यावर जाण्यास खूप मज्जा वाटते. बोटी सुरू झाल्याने अनेक पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे.संघटनांनी आपापसात समन्वय साधावादोन्ही संघटनांच्या वादाची दखल महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डानेही घेतली आहे. दोन्ही संघटनांनी आपापसात समन्वय साधून, कोणालाही त्रास होणार नाही, अशाप्रकारे व्यवसाय करावा, असे परखड मत व्यक्त केले आहे. शिडांच्या बोटी सुरू झालेल्या असल्या तरी वेलकम सोसायटी व जंजिरा पर्यटक सोसायटीची सयुंक्तिक सभा मेरी टाइम बोर्डाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यामध्ये कोणाच्या किती बोटी किल्ल्यावर सोडायच्या, हे प्रमाण दोन्ही संघटनांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येणार असल्याची माहिती कॅप्टन सूरज नाईक यांनी दिली आहे. ही बैठक १७ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. जंजिरा पर्यटक सोसायटीचे व्यवस्थापक नाझभाई कादरी यांनी शिडाच्या बोटी सुरू केल्याबद्दल स्थानिक आमदार पंडित पाटील व कॅप्टन सूरज नाईक यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.किल्ला पाहाण्यासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. मेरी टाइम बोर्डाचे राजपुरी येथील वाहनतळ चारचाकी गाड्यांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. नाशिक, सोलापूर, नागपूर, यवतमाळ, ठाणे, मुंबई येथील पर्यटकांनी हा किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या