शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीच्या 'सीएफएस'मध्ये जप्त केलेले कंटेनर धूळखात पडून  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 00:15 IST

काही कंपन्या कंटेनरमधून बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन तस्करीच्या मालाची आयात-निर्यात करतात.

उरण : सीमा शुल्क विभागाच्या विविध विभागांकडून संशयित किंवा तस्करीच्या कामासाठी वापरलेले अथवा बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन आयात-निर्यातीच्या प्रकरणात कारवाईअंती जप्त करण्यात येतात.  सीएफएसमध्ये असे शेकडो संशयित कंटेनर अनेक वर्षांपासून जेएनपीटीच्या स्पीडी कंटेनर यार्डमध्ये धूळखात पडून असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.

जेएनपीटी बंदर सध्या आंतरराष्ट्रीय माफियांचा अड्डा बनला आहे. सोने, रक्तचंदन, अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. डीआरए, सीमा शुल्क विभागाच्या विविध विभागांकडून विविध प्रकारच्या तस्करीत वापरण्यात आलेले कंटेनर जप्त केले जातात. उरण परिसरातील कोणत्याही कंटेनर यार्डमध्ये तस्करीत वापरण्यात आलेले कंटेनर येथील जेएनपीटीच्या सीएफएमध्ये आणले जातात. 

काही कंपन्या कंटेनरमधून बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन तस्करीच्या मालाची आयात-निर्यात करतात. अशा चोरट्या मालाची आयात-निर्यात करताना तस्करीत सहभागी असलेल्या कंपन्या आपले बिंग फुटले जाऊ नये यासाठी बनावट कंपन्यांंच्या नावाचाही वापर करतात. आयात-निर्यातीच्या बेनामी तस्करी प्रकरणात जप्त करण्यात आलेले कंटेनर बेवारस म्हणून घोषित केले जातात. आयात करण्यात आलेला माल ने-आण करताना खराब झालेला असतो. अशा प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मालक कंटेनर ताब्यात न घेता तसेच सोडून देतात. परिणामी, असे शेकडो कंटेनर येथील सीएफएस ठेवण्यात येतात. सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात असलेल्या अशा कंटेनरची संख्या सध्या वाढतच चालली आहे. त्यामुळे जेएनपीटी परिसरात तस्करीच्या प्रमाणात वाढ होत चालली असल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे.