शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काशिद येथे देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

By admin | Updated: January 28, 2017 03:00 IST

मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका टेम्पोमध्ये चोरटी दारू विकणाऱ्या दोघांना रंगेहाथ

नांदगाव/मुरुड : मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एका टेम्पोमध्ये चोरटी दारू विकणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात मुरु ड पोलिसांना यश आले आहे. या टेम्पोमधून तीन लाख ६८ हजार १६५ रु पयांचा माल जप्त करण्यात आला आहे.२५ जानेवारी रोजी एका महिलेच्या घरासमोर एमएच ०६-बीजी -१९३८ हा दारूने भरलेला टेम्पो माल पुरवठा करण्यासाठी आला होता. काशिद ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदी अमलात आलेली असून येथे गावातील अथवा बाहेरील व्यक्तीस दारू विकण्यास सक्त मनाई आहे. परंतु असे असताना देखील येथील एक आदिवासी महिला चोरून दारू विकत असल्याचा सुगावा काशिद ग्रामस्थांना लागला होता. दारूने भरलेला टेम्पो ज्यावेळी माल पुरवठा करण्यासाठी आला, त्याच वेळी काशिद ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे, पोलीस पाटील ऊर्मिला सावंत, परवेश बेलोसे, रोहन खोपकर, भालचंद्र बेलोसे, मनोहर बेलोसे, दत्ताराम बेलोसे, जगदीश काते, संचित खोपकर व शरद बेलोसे आदींनी हा टेम्पो अडवून मुद्देमालासह पकडून मुरु ड पोलिसांच्या ताब्यात दिला. मुरु ड पोलिसांनी हा टेम्पो जप्त करून यातील तीन लाख ६८ हजार १६५ रु पयांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. या टेम्पोतील माल वाहून नेणारे संतोष गोपाळ पाटील, शैलेश अशोक पडवळ या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मोहिते करीत आहेत. काशिद ग्रामस्थांनी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल आभार व्यक्त केले. (वार्ताहर)