शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल भरण्यासाठी ग्राहक तासन्तास रांगेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:54 IST

उशिरा बिल येत असल्याने संताप : पावसाचा त्रास; पर्यायी व्यवस्थेची मागणी

नेरळ : वीज ही मनुष्याच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली आहे. मात्र, याचे नियोजन नसल्याने ती ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नेरळ परिसरात तारखेच्या नंतर बिल दाखल होत असल्याने आणि ती भरण्यासाठी सध्या एकच ठिकाण कार्यरत असल्याने तासन्तास पावसाचा मारा सहन करत ग्राहकांना रांग लावून उभे राहावे लागत आहे. आधीच वाढीव बिल त्यात खूप वेळ रांगेत उभेराहावे लागल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त के ला जात आहे. तेव्हा ही बिलाची डोकेदुखी कधी संपणार आणि पर्यायी व्यवस्था कधी होणार, असा प्रश्न महावितरणच्या नेरळ परिसरातील नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

नेरळ हे ग्रामपंचायत क्षेत्र लोकसंख्येच्या दृष्टीने नगरपालिकेच्या तुलनेने आहे. खूप झपाट्याने नेरळ आणि परिसरातील गावांचे नागरीकीकरण होत आहे, त्यामुळे येथे महावितरणचे कार्यालयही दोन आहेत. मात्र, ते कोसावर आहेत. त्यात बिल भरण्याची सुविधा अपुरी आहे. मागे नेरळमध्ये जागृती नागरी सहकारी बँक व रायगड जिल्हा मध्यावर सहकारी बँकेत महावितरणची बिले भरण्याची सुविधा होती. मात्र, काही कारणाने जागृती नागरी सहकारी बँकेची नेरळ येथील शाखा बंद झाली आणि बिलांचा भार रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पुन्हा आला. त्याच दरम्यान नेरळ येथील पाडा विभागात कर्नाळा सहकारी बँक सुरू झाली आणि तिथेही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली. महावितरणचे ग्राहक आनंदले; जास्त वेळ रांगेत थांबावे लागणार नाही, अशी त्यांची समजूत झाली असताना सुरुवातीच्या काळात तिथे इंटरनेट अनेक वेळा बंद पडत असल्याने जास्त वेळ बिल भरलेच जात नव्हते. नंतर ती समस्या सुटल्यावर कर्नाळा बँकेत बिल भरले जाऊ लागले तर रायगड बँकेत इंटरनेट समस्या उद्भवली आहे. त्यामुळे कधीही एकच बँक बिल भरण्यासाठी उपलब्ध असल्याचे चित्र असते. एकतर आधीच विविध आकाराने लाइट बिलांच्या रकमेचा आकडा फुगलेला त्यात तो भरण्यासाठी भरपावसात नाहीतर कडक उन्हात ग्राहक रस्त्यावर तासन्तास उभे, याचा त्रास ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसोबत आलेल्या महिलांना होत आहे. महावितरणने डिजिटल वॅलेटने सुविधा जरी पुरवली असली तरी ग्रामीण भाग असल्याने आणि बहुतांश लोकांना ही सुविधा वापरायला जमत नसल्याने आणि बिलाची पहिली तारीख निघून गेल्यावर बिल हातात पडत असल्याने मोठ्या प्रमाणात बिल भरण्यासाठी गर्दी होताना दिसते.नेरळ येथे दोन विद्युत बिल भरणा केंद्र आहेत. ग्राहकांची गर्दीची समस्या लक्षात घेता आम्ही संबंधित बँकेला उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तसेच नेरळ येथील महावितरण कार्यालयात डिजिटल पद्धतीने बिल भरण्यासाठी सोय केली जाणार आहे. या व्यतिरिक्त नेरळ परिसरात नागरी पतसंस्था उपलब्ध झाल्यास ग्राहकांसाठी तिथे बिल भरण्याची सुविधा केली जाईल ही बाब विचाराधीन आहे.- आनंद घुले, उपअभियंता, महावितरण, कर्जत 

टॅग्स :Raigadरायगड