शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 01:08 IST

भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य : प्लॅस्टिकबंदीमुळे विद्युत रोषणाईवर भर; पर्यावरणपूरक साहित्यालाही मागणी

अलिबाग : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाच्या आगमनामुळे वातावरणात प्रसन्नता आणि उत्साह निर्माण झाला आहे. दीड दिवसांपासून २१ दिवसांपर्यंत बाप्पाचा मुक्काम भक्तांच्या घरी राहणार आहे. बाप्पाच्या सेवेत कसलीच कमतरता राहू नये, यासाठी जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी चांगलीच धूम आहे. सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, हार, फळे अशा हरतºहेच्या वस्तूंना बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे बाजारपेठ फुलून गेल्या आहेत.

घरगुती अथवा सार्वजनिक मंडळाचा गणेशोत्सव हा उत्सव अधिकाधिक प्रकाशित करण्यासाठी भाविक आकर्षक विद्युत रोषणाई करण्यावर भर देतात. त्या दृष्टीने विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. विद्युत रोषणाईच्या बाजारपेठेमध्ये यंदा भारतीय वस्तू नव्याने दाखल झाल्या आहेत. एलईडी, दहा ते शंभर वॉटच्या सिंगल-मिल्टकलर फ्रेड लाइट्स, झालर यासारखे प्रकार उपलब्ध आहेत. सर्वाधिक पसंती एलईडी बल्बच्या माळांना मिळत आहे. याबरोबरच रोब लाइट्स, लेझर लाइट्स, पार लाइट्स, रोटरेटिंग लॅम्प, चक्र , एलईडी फोकस, एलईडी स्ट्रीप सेट, फळे, फुले व पानांची तोरणे, छोटी-मोठी झाडे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तीन रंग, सहा रंग ते १६ रंगांच्या एलईडी स्ट्रीप सेटलाही जास्त मागणी असल्याचे दिसून येते. त्यांच्या किमती ८० रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत आहेत. स्वदेशी वस्तू महाग असल्या तरी त्या खरेदी केल्या जात आहेत.सार्वजनिक मंडळांचेही सजावट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पावसापासून बाप्पाचे रक्षण करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना चोख व्यवस्था केल्याचे दिसून येते.पेणच्या बाजारात गणेशभक्तांची लगबग१पेण : उत्सवाच्या खरेदीसाठी पेणच्या बाजारापेठेत अलोट गर्दी उसळली होती. फळे, फुले, मेवा, मिठाई, पूजेसाठी २१ पत्री, धूप, अगरबत्ती, विविध प्रकारच्या शोभेची फुले, कापडी तोरण, दही, दूध, मध, तूप, लोणी, केशर, नारळ आदी वस्तूंच्या खरेदीसाठी गणेशभक्तांची सकाळपासून लगबग सुरू होती.२पावसाचा व्यत्यय असला तरी भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. एकीकडे बाजारात झुंबड उडाली असताना, दुसरीकडे वाहतूककोंडीमुळे पेण शहरात जागोजागी नागरिकांना मुख्य रस्त्यावर मार्ग काढण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करावे लागत होते.३गणेशमूर्ती नेण्यासाठी खासगी वाहने, स्थानिक वाहने, एसटी महामंडळाच्या बसेस, दुचाकी, टेम्पो या वाहनांची रेलचेल सतत सुरू होती. 

टॅग्स :raigad-pcरायगडRaigadरायगड