यदु जोशी - मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे किमान 55 ते 6क् उमेदवार बदलण्यात येतील अशी शक्यता आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गमावलेल्या जागांवर अनेक नव्या चेह:यांना संधी दिली जाणार आहे.
2क्क्9 च्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडीमध्ये 174 जागा लढविल्या होत्या, त्यापैकी 82 जागा जिंकल्या होत्या. 92 ठिकाणी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या 92 पैकी केवळ 35 ते 4क् जणांनाच पुन्हा संधी दिली जाईल. इतरांचा पत्ता कट होईल, असे समजते.
निवडून आलेल्या 82 आमदारांपैकी अशोक चव्हाण आणि राजीव सातव अलिकडे खासदार झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी आमदारकीचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तीन ठिकाणी नव्या चेह:यांना संधी मिळेल.
विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट द्यावे, अशी शिफारस केंद्रीय छाननी समितीने केंद्रीय निवड मंडळाकडे केलेली होती. तथापि, सरसकट सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी कशासाठी? नव्या चेह:यांचा विचारदेखील झाला पाहिजे, असे मत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवड मंडळाच्या बैठकीत व्यक्त झाल्यानंतर काही विद्यमान आमदार बदलण्याबाबत विचार सुरू झाला आहे. मात्र आता ऐनवेळी असे बदल करणो योग्य ठरणार नाही, असाही एक विचारप्रवाह आहे.
गेल्यावेळी पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी नाकारताना काही निकष आणि कसोटय़ा लावण्यात आल्या आहेत. पराभवानंतर उमेदवार गेली पाच वर्षे मतदारसंघात कितपत सक्रिय होते आणि पक्षाचे कार्यक्रम राबविण्यात ते सक्रिय होते का, या बाबी तपासून पाहण्यात आल्या.
पराभवाचे अंतर 15-2क् हजारापेक्षाही अधिक असेल आणि आता त्या मतदारसंघात पर्यायी चांगला उमेदवार असेल तर त्याला संधी देऊन आधीच्याला विश्रंती दिली जाणार आहे. मोठय़ा फरकाने पराभव होवूनही पर्यायी उमेदवार नसेल तर आधीच्या उमेदवाराला पुन्हा संधी देण्याशिवाय पक्षाकडे पर्याय नसेल. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसने 1क् जागा वाढवून दिल्या तर काँग्रेस 164 जागा लढेल. त्या परिस्थितीतही काँग्रेस जवळपास 5क् ते 55 उमेदवार बदलेल, अशी शक्यता आहे.
भोकरमधून अमिता चव्हाण?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प}ी अमिता चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. इतरांप्रमाणो नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देण्याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय निवड मंडळ घेईल. त्यात उद्योग मंत्री नारायण राणो आणि माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या मुलांचाही समावेश आहे.