शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तळोजामध्ये एमडीसह चरस जप्त

By admin | Updated: February 5, 2017 02:51 IST

अंमली पदार्थविरोधी पथकाने तळोजामध्ये धाड टाकून ६० ग्रॅम मेथ्याफेटामाइन (एमडी पावडर) व १०० ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले आहे. या प्रकरणी महम्मद साबीर

नवी मुंबई : अंमली पदार्थविरोधी पथकाने तळोजामध्ये धाड टाकून ६० ग्रॅम मेथ्याफेटामाइन (एमडी पावडर) व १०० ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले आहे. या प्रकरणी महम्मद साबीर महम्मद याकुब शेख व शोएब हनिफ खान या दोघांना अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. शहरातील टारझन, पांडेसह अनेक माफियांना गजाआड केल्यानंतर, आता पनवेल, उरण परिसरातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मालमत्ता व अंमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक राणी काळे यांना तळोजा परिसरामध्ये दोन व्यक्ती मेथ्याफेटामाइन व चरस विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ३ फेब्रुवारीला हॉटेल संतोष अँड जयेश समोर सापळा रचला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होंडा अ‍ॅक्टिव्हा एमएच ०१ सी यू ३३६० वरून दोन तरुण आले. या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली. त्यांच्याकडे प्लॅस्टिक पिशवीमध्ये ठेवलेली ६० ग्रॅम एमडी पावडर व १०० ग्रॅम चरस आढळून आले. या अंमली पदार्थांची किंमत २ लाख ३३ हजार रुपये आहे. या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर तळोजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकलही जप्त केली आहे. आरोपींना अटक करण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह पोलीस निरीक्षक माया मोरे, सचिन भालेराव, राजेश गाढवे, अमोल कर्डीले, आकाश मुके, रवींद्र राऊत, कासम पिरजादे, मनोज जाधव, सचिन भालेराव व इतरांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)