शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

माकपाच्या सरकारविरोधी रास्ता रोकोला पालघर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: September 3, 2015 02:47 IST

भाजपप्रणीत केंद्र सरकार तसेच राज्य सरकारची धनिकधार्जिणी धोरणे, धर्मांध आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मार्क्सवादी आणि जनसंघटना तालुका कमिटी विक्रमगड यांच्यातर्फे जव्हार,

जव्हार : भाजपप्रणीत केंद्र सरकार तसेच राज्य सरकारची धनिकधार्जिणी धोरणे, धर्मांध आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मार्क्सवादी आणि जनसंघटना तालुका कमिटी विक्रमगड यांच्यातर्फे जव्हार, विक्रमगड, वाडा, डहाणू येथील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी बुधवारी रास्ता रोको करण्यात आले. त्याला पालघर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद लाभला असला तरी जव्हारमध्ये त्याचा परीणाम दिसून आला.या वेळी तलावली-वेहेलपाडा येथे यशवंत गरेल, सरपंच, बाबुलाल फडवळे यांच्या नेतृत्वाखाली १०० ते १२५ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्यात आला, तर तलवाडा येथे तालुका कमिटी सदस्य संजय काकड, अमृत भावर, चंदू भावर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. कासा येथे चंद्रकांत वरठा, विभागीय सचिव चिंतामण लाबड आणि कॉ. एडवर्ड वरठा यांच्या नेतृत्वाखाली ४०० ते ५०० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. विक्रमगड नाका, घोलवड, सावटा, उपराळे, डहाणू, वाणगाव, तलासरी येथेही मोठ्या संख्येने मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.या रास्ता रोकोमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. लांबून येणारे प्रवासी रास्ता रोकोमध्ये अडकल्यामुळे त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला. (वार्ताहर)सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनतर्फे पुकारलेल्या देशव्यापी बंदला तलासरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तलासरीत बाजारपेठ पूर्णत: बंद होती, तर तालुक्यातील चार ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे रास्ता रोको करण्यात आल्याने दुपारपर्यंत वाहतूक ठप्प झाली. या बंदचा फटका नागरिकांबरोबर शालेय विद्यार्थ्यांनाही बसला. बंदच्या पार्श्वभूमीवर तलासरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. ग्रामसेवक संघटनाही बंदमध्ये उतरल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला. तसेच अंगणवाडी कार्यकर्त्याही संपात उतरल्या. वाहतूक बंद पडल्याने विद्यार्थ्यांना ६ ते ७ कि.मी. पायी चालत शाळेत यावे लागले.तलासरी-उधवा रोडवर मोडगावफाटा, तलासरी-उंबरगाव रोडवर वडवली नाका, करजगाव ते उंबरगाव रोडवर वसा-डोंगरीपाडा, आमगाव-संजान रोडवर आमगाव-मांगातपाडा येथील वाहतूक दुपारपर्यंत बंद होती. या भागातील कारखाने, कॉलेजही बंद ठेवण्यात आली होती. तसेच भाजपप्रणीत नरेंद्र मोदी सरकारने कामगार कायद्यात व भूसंपादन कायद्यात भयानक बदल केल्याने लाल बावटा जिल्हा कामगार युनियन यांच्या वतीने तलासरीत रॅलीचेही आयोजन करण्यात आले.