शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गॅसवाहिनीचे काम पूर्ण

By admin | Updated: October 25, 2015 00:24 IST

सिडको वसाहतीत महानगर गॅसच्या माध्यमातून वाहिन्यांद्वारे गॅस पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ठिकठिकाणी गॅसवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे.

- अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोलीसिडको वसाहतीत महानगर गॅसच्या माध्यमातून वाहिन्यांद्वारे गॅस पुरविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पनवेल परिसरात ठिकठिकाणी गॅसवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. इतर ठिकाणी खोदकाम करून वाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी खाडीप्रवण क्षेत्रात कांदळवनामुळे अनेक अडचणी येत होत्या. कांदळवने वाचविण्यासाठी कोपरा खाडीच्या खालून पाइपलाइन ‘ट्रेज लेस’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, हे काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे कांदळवनांची हानी टळली आहे. त्यामुळे लवकरच सिडको वसाहतीतील रहिवाशांना पाइपद्वारे गॅसपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पनवेलची लोकसंख्या साडेआठ लाखांवर पोचली आहे. या ठिकाणी होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महानगराच्या दृष्टीने शहराची वाटचाल सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात विविध पायाभूत सुविधांचे जाळे पसरविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पैकी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईत याच प्रकारे पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवला जातो. त्याच धर्तीवर सिडको वसाहती आणि पनवेल शहराला गॅसपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस निगम लिमिटेडद्वारे पाइपलाइन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सुरुवातीला खारघर वसाहतीपर्यंत गॅसच्या वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शेडुंगपर्यंत विस्तारण्यात आल्या. मात्र खारघर आणि कळंबोली यादरम्यान असलेल्या कोपरा खाडी व आजूबाजूला कांदळवन असल्याने त्या पट्ट्यातील काम थांबले होते. मात्र या ठिकाणी पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एलीटी मशिनद्वारे ट्रेज लेस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याकरिता जिप्सम स्ट्रक्चर या कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. तळोजा लिंक रोडलगत पॉइंट तयार करून या ठिकाणाहून ड्रिलिंगद्वारे काम करण्यात आले. ही वाहिनी जमिनीखाली टाकण्यात आली आहे. ती फुटण्याचा अथवा गॅस गळतीचा धोका नाही. कुठेही तांत्रिक बिघाड झाला तरी त्याचा परिणाम या पट्ट्यात होणार नाही, तशी यंत्रणा या ठिकाणी बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर कांदळवनाचा ऱ्हास न होता पाइपलाइन टाकण्यात आली आहे. खोली जास्त असल्याने झाडांच्या मुळाला कोणतीही इजा पोहोचणार नसल्याचे पर्यावरणतज्ज्ञ तारिक बिलाल म्हणाले.