शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजबिलांच्या ढीगभर तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 01:21 IST

बिले पाहून अनेक ग्राहकांना वीजबिलांचा धक्काच बसला आहे. अव्वाच्या सव्वा बिले आल्याने ग्राहक चिंतेत आहेत.

दासगाव : मार्च महिन्यात संचारबंदी लागू झाली आणि सर्वच व्यवहार ठप्प झाले. यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रीडिंग घेणे अशक्य झाले, तर ग्राहकांनाही वीजबिले भरणे शक्य झाले नाही. सद्यस्थितीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने अनेकांना वीजबिले मिळाली. मात्र, बिले पाहून अनेक ग्राहकांना वीजबिलांचा धक्काच बसला आहे. अव्वाच्या सव्वा बिले आल्याने ग्राहक चिंतेत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वीजबिले भरण्यास बाहेर पडणे कोणालाच शक्य नव्हते. त्यातच महावितरण विभागानेही मीटर रीडिंगचे काम बंद ठेवले होते. यामुळे मार्च महिन्यापासून सरासरी बिले काढून ग्राहकांना पाठविण्यात आली. ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊन लागू केल्याने, घरात वीज वापर प्रतिदिन वापरापेक्षा अधिक झाला. फ्रीज, ए.सी., पंखे याशिवाय टीव्ही संच दिवसभर सुरू राहिल्याने वीजबिले वाढल्याची शक्यता महावितरण विभागाने व्यक्त केली आहे, तर दुकाने, लघू व्यावसायिक, कारखानदार यांचा वीज वापर कमी प्रमाणात झाला असला, तरी वीजबिले मात्र अधिक आल्याने व्यावसायिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. घरगुती ग्राहकांना मात्र वीजबिले अधिक आल्याने महाड उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ग्राहकांनी गर्दी केली. हजाराच्या पटीत ही वीजबिले आल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. ऐन लॉकडाऊन काळात अनेकांचे लघू व्यवसाय, नोकºया गेल्याने हातात पैसा उरलेला नसतानाच आलेल्या वीजबिलांनी संतापले आहेत. या बिलांचा भरणा कसा करायचा, असा यक्ष प्रश्न ग्राहकांसमोर आहे.लॉकडाऊन काळात वीजबिले आॅनलाइन भरणा करण्यासंदर्भात शासनाने प्राधान्य दिले होते. यामुळे अनेकांनी महावितरण अ‍ॅपऐवजी अन्य खासगी अ‍ॅपद्वारे वीजबिल भरणा केलेला आहे. मात्र, वीजबिले भरूनही आलेल्या बिलांमध्ये भरलेल्या रकमेचा पुन्हा समावेश झाला असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. अनेकांना यापूर्वी कमी वीजबिल येत होते. मात्र, आता आलेले वीजबिल हे हजाराच्या संख्येत आले आहे. यामुळे ग्राहकांनी महावितरण कार्यालयासमोर वीजबिले कमी करून मिळावी, याकरिता गर्दी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही गर्दी होत असून, महावितरणचा एक कर्मचारी या सर्वांना तोंड देत, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहे.>ग्राहकांना पावसात उभे राहावे लागतेयमहावितरणच्या नियमानुसार ३०० आणि ५०० युनिटच्या वर एक जरी युनिट पडला, तरी वीज आकार वाढत आहे. सलग तीन महिने वीजबिल भरणा न झालेल्या ग्राहकांना यामुळे वाढीव बिलांचा फटका बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या ग्राहकांना कार्यालयात प्रवेश दिला जात नसल्याने, कार्यालयाच्या खिडकीतून कर्मचारी या समस्या जाणून घेत असला, तरी बाहेर पावसात या ग्राहकांना उभे राहावे लागत आहे. शिवाय ज्या ठिकाणी हे ग्राहक उभे राहत आहेत, त्या ठिकाणी पाणी साचले असल्याने याबाबतही ग्राहकांनी आपला संताप व्यक्त केला.