शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

प्रांत कार्यालयात रंगली संगीत खुर्ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:26 IST

शारदा पोवार यांची मॅटमध्ये धाव; प्रशांत ढगे यांना सोडावी लागली खुर्ची

रायगड : : अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयात सध्या संगीत खुर्चीचा कार्यक्रम अनुभवास मिळाला. शारदा पोवार यांच्या जागी प्रशांत ढगे यांची सरकारने बदली केली होती. त्यानुसार, ढगे यांनी कार्यालयात येऊन कामकाज हाती घेतले असतानाच, शारदा पोवार यांनी मॅटमध्ये धाव घेतली. आणि बदलीबाबत स्टे मिळविला. त्यामुळे ढगे यांना खुर्ची सोडावी लागली आहे.शारदा पोवार या अलिबाग प्रांताधिकारी या पदावर अडीच वर्षे काम करीत आहेत. सरकारने राज्यातील उपविभागीय अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची नुकतीच बदली प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग येथील विशेष भूसंपादन अधिकारी प्रशांत ढगे यांची अलिबाग प्रांताधिकारी म्हणून बदली करण्यात आली. प्रशांत ढगे यांनी सरकारी निर्णयानुसार, अलिबाग येथे येऊन सर्व सोपस्कार पूर्ण करत अलिबाग प्रांताधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, शासनाने ढगे यांची बदली केलेली असताना, शारदा पोवार यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात मॅटमध्ये धाव घेतली. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नसताना, सरकारने अचानक बदली केल्याची कैफियत त्यांनी मॅटसमोर मांडली. मॅटने शारदा पोवार यांची बाजू ग्राह्य धरत त्यांच्या बाजूने निकाल दिला. पोवार यांना अलिबागच्या प्रांताधिकारी पदावर कायम ठेवण्याचे आदेश मॅटने दिले. त्यामुळे ढगे यांनी पदभार स्वीकारूनही त्यांना आपली खुर्ची काही कालावधीतच सोडावी लागली आहे.त्याचप्रमाणे, मी पदभार स्वीकारल्याबाबत मॅटच्या निर्दशनास आणून दिलेले नाही. या प्रकरणी २९ आॅक्टोबरला माझी मॅटमध्ये सुनावणी होणार आहे, असे प्रशांत ढगे यांनी स्पष्ट केले. शारदा पोवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.‘माझी बदली रद्द नाही’सरकारच्या निर्णयानुसार मी अलिबाग प्रांताधिकारी कार्यालयाच पदभार स्वीकारला होता. त्याच कालावधीत शारदा पोवार यांनी मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने बदलीला स्टे दिला आहे. मात्र, माझी बदली अद्याप रद्द केलेली नाही. पोवार यांनी अलिबाग येथे राहावे, पण प्रांताधिकारी पदावर असा उल्लेख आदेशात केलेला नाही. पोवार यांनी त्याच खुर्चीत बसण्याआधी जिल्हाधिकारी अथवा कोकण आयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक होते, असे प्रशांत ढगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.