शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वसाहतींना अवजड वाहनांचा गराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 00:20 IST

कळंबोलीसह खांदा वसाहत आणि कामोठे वसाहतीला अवजड वाहनांनी गराडा घातला आहे. याचा सर्वाधिक त्रास कळंबोलीकरांना होत असताना कळंबोली वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत

पनवेल : कळंबोलीसह खांदा वसाहत आणि कामोठे वसाहतीला अवजड वाहनांनी गराडा घातला आहे. याचा सर्वाधिक त्रास कळंबोलीकरांना होत असताना कळंबोली वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वसाहतींतील रस्त्यांना पार्किंगचे स्वरूप आले असून, जिकड तिकडे ट्रक, कंटेनर्स उभे दिसत आहेत. कळंबोली वसाहतीच्या बाजूला लोह-पोलाद मार्केट आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालाची चढ-उतार होते. त्याचबरोबर बाजूला पनवेल-सायन आणि एनएच4 बी हे महामार्ग जातात. परिणामी या परिसरात अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. काही वर्षांपूर्वी वाहने उभे करण्यावरून मोठे वादंग निर्माण झाले होते. दोन गटांत झालेल्या वादाला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे कळंबोलीत अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या घडीला ट्रक, कंटेनर, टँकरला नो इंट्री आहे. असे असतानाही वसाहतीत मोठ्या प्रमाणात अशी वाहने घुसखोरी करीत आहेत. त्याचबरोबर वसाहतींत गॅरेज थाटण्यात आली आहेत. रोडपाली परिसरातील जवळपास सर्व रस्ते अवजड वाहनांनी हायजॅक करण्यात आले आहेत. भरधाव वेगाने कंटेनर येत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. (वार्ताहर)अवजड वाहनांवर नियमित कारवाई केली जाते; मात्र मला निश्चित आकडा सांगता येणार नाही. खांदा वसाहत, कामोठे वसाहतीत काय परिस्थिती आहे ती पाहतो आणि मग कारवाई करतो. नो एंट्रीत प्रवेश करणाऱ्या वाहनांवर आपण कारवाई करू- दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक,कळंबोली वाहतूक शाखा