शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दिघी पोर्टजवळ कॉइलचा ट्रेलर घुसला घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:48 IST

दांडगुरी : म्हसळा तालुक्यातील खरसई ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या एका वळणावर दिघी पोर्टमधून लोखंडी कॉइल वाहून नेणाºया ट्रेलरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये ट्रेलर रस्त्यालगत असणाºया एका घरामध्ये घुसला. या वेळी प्रसंगावधान राखल्याने घरातील दाम्पत्य थोडक्यात बचावल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.शुक्रवार, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महादेव नाक्ती आपल्या ...

दांडगुरी : म्हसळा तालुक्यातील खरसई ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या एका वळणावर दिघी पोर्टमधून लोखंडी कॉइल वाहून नेणाºया ट्रेलरचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातामध्ये ट्रेलर रस्त्यालगत असणाºया एका घरामध्ये घुसला. या वेळी प्रसंगावधान राखल्याने घरातील दाम्पत्य थोडक्यात बचावल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.शुक्रवार, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महादेव नाक्ती आपल्या खरसई येथील घरामध्ये टीव्ही पाहत असताना त्यांना वाहनाचा मोठा आवाज आला. या वेळी एक ट्रेलर (एमएच १२ पीक्यू ५२१९) त्यांच्या घरावर आदळला. नाक्ती यांनी प्रसंगावधानाने त्यांचे व पत्नीचे प्राण वाचवले. मात्र, या अपघातात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. घरामध्ये असणारे एक बोकड व दहा कोंबड्या ट्रेलरखाली चिरडल्या गेल्या. अपघातामध्ये चालकदेखील गंभीररीत्या जखमी झाला असून, याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.>अवजड वाहतूक धोकादायकआंतरराष्ट्रीय पातळीच्या दिघी पोर्ट प्रशासनाकडून २० टन क्षमता असणाºया रस्त्यावरु न अवैधरीत्या ४० टनाच्या अतिभाराच्या लोह कॉइल व कोळशाची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. ग्रामस्थांकडून वारंवार तक्रार होऊनही प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. मोठ्या कष्टाने घर बांधले असून दिघी पोर्ट येथे सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे आमचा संसार उघड्यावर आला आहे. या प्रकरणी ट्रेलरचालकावर कारवाई करावी.- महादेव नाक्ती, अपघातग्रस्त