शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात गस्तीसाठी तटरक्षक, नौदलाच्या बोटी तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 00:55 IST

समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी कोस्ट गार्ड आणि नौदलाच्या बोटींचा समावेश करण्यात आला आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी कोस्ट गार्ड आणि नौदलाच्या बोटींचा समावेश करण्यात आला आहे. एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. कायदे धाब्यावर बसवणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा सज्जड दमच जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. पर्ससीन मासेमारी करणाºया बोटींनी त्यांना नेमून दिलेल्या चॅनेलमध्येच मासेमारी करावी, अन्यथा त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून पारंपरिक मासेमारी करणारे आणि एलईडी तसेच पर्ससीन मासेमारी करणाºया गटांमध्ये सातत्याने संघर्ष होत आहे. हा संघर्ष इतका विकोपाला गेला आहे की, भरसमुद्रामध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. कमी प्रमाणात मिळणारे मासे आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे भविष्यात असे संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.मासेमारी करणाºया पारंपरिक मच्छीमारांमध्ये भीतीसह दहशतीचे सावट आहे. त्यामुळे अशा घडणाºया घटनांना विरोध करण्यासाठी ३ जानेवारी रोजी पारंपरिक मच्छीमार करणाºया संघटनांनी रायगड जिल्हा पारंपरिक मच्छीमार संघर्ष समितीची स्थापना केली. त्याचे नेतृत्व दिलीप भोईर यांच्याकडे देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. सरकार आणि प्रशासनाने तातडीने पारंपरिक मच्छीमारांवर होणारा अन्याय दूर करावा, त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी करत ३ जानेवारी रोजी अलिबाग कुलाबा किल्ला परिसरामध्ये सुमारे दीड हजार बोटींच्या माध्यमातून बोट आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेत संघर्ष समितीने आंदोलन मागे घ्यावे, त्यांच्या मागण्यांबाबत बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी निर्माण केला. बैठकीमध्ये पारंपरिक मासेमारी करणाºयांची बाजू भोईर यांनी मांडली.कायद्याने एलईडी मासेमारी करण्याला बंदी आहे, त्यामुळे ती तातडीने बंद केलीच पाहिजे, असे फर्मान सूर्यवंशी यांनी सोडले. कायदे धाब्यावर बसवून आणि कायदे हातात घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, तसेच पर्ससीन मासेमारी करणाºया बोटींना ठरावीक चॅनेलमध्येच मासेमारी करण्याची परवानगी कायद्याने दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कायद्याचा बडगा उगारण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.पोलीस प्रशासन आणि मत्स्य विकास अधिकारी कार्यालयाकडे खोल समुद्रामध्ये गस्त घालण्यासाठी बोटी नाहीत. तटरक्षक दल आणि नौदल यांच्याकडे मनुष्यबळ आणि बोटी असल्याने त्यांनी अशा घटनांवर लक्ष ठेवावे, अशा सूचना केल्याचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हाधिकारी यांनी पारंपरिक मासेमारी करणाºयांसाठी सकारात्मकता दाखवली आहे. कायदे धाब्यावर बसवणारे आणि कायदे हातात घेणाºयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.>जिल्हाधिकारी यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता पारंपरिक मासेमारी करणाºयांच्या मनामध्ये भीती राहणार नाही. प्रत्येकाने कायद्याचे पालन केल्यास संघर्ष निर्माण होणारच नाहीत, असे मांडवा येथील मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष अनिल भिंगारकर यांनी सांगितले.