शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेचे काम पाडले बंद

By admin | Updated: June 13, 2017 03:01 IST

तालुक्यातील रामराज परिसरात राष्ट्रीय पेयजल योजनेतून उभारण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले. सुमारे एक हजार

- लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील रामराज परिसरात राष्ट्रीय पेयजल योजनेतून उभारण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले. सुमारे एक हजार ५०० ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी ही रामराज नदीपात्रात बांधलेली आहे. त्यामुळे ती कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.अलिबाग तालुक्यातील रामराज मोहल्ला, कोळीवाडा, मराठा आळी, दलित वस्ती असे चार पाडे आहेत. येथील नागरिकांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत सुमारे ४५ लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना २०१३ आखण्यात आली होती. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या कामाची निविदा काढली होती. २०१६ पर्यंत काम पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र २०१७ उजाडले तरी, काम पूर्ण झाले नव्हते.मुळात नदीपात्रात टाकी बांधण्याला स्थानिक ग्रामस्थ संतोष काटे यांनी आक्षेप घेत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीची गांभीर्याने दखल न घेतल्याने ते काम तसेच सुरु ठेवून पाण्याची टाकी रामराज नदीपात्रामध्ये उभारली. नदीपात्रात पाण्याची टाकी बांधल्याने नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यात ती पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय झाला आहे, असे असताना ठेकेदाराने आता नदीपात्रातून पाइपलाइनचे काम दोन दिवसांपूर्वी सुरु केले होते मात्र पुराच्या पाण्याचा पाण्याच्या टाकीला धोका आहे, तसाच पाइपलाइनला आहे. त्यामुळे काम बंद ठेवण्याबाबत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रकाश माळी यांना कळविले असल्याचे ग्रामपंचायत सदस्य नदीम बेबन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.यातील गंभीर बाब म्हणजे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये उमटे धरणातील पाणी सोडण्यात येणार आहे. उमटे धरणाच्या पाण्यासाठी फिल्टरेशन प्लॅन्ट अद्याप बसविण्यात आलेले नाही. त्याबाबतचे सुमारे दोन कोटी ९० लाख रुपयांचे बिल मात्र ठेकेदाराला अदा करण्यात आलेले आहे. अशुध्द पाणीपुरवठ्यामुळे आधीच रान पेटले असताना आता नव्याने पाइपलाइनचे काम करण्यात येत होते. त्याला आक्षेप घेतला असल्याचे अ‍ॅड.कौस्तुभ पुनकर यांनी सांगितले.रामराज मोहल्ला, कोळीवाडा, मराठा आळी आणि दलित वस्ती या भागातून आधीच पाइपलाइन गेलेली आहे. त्याच पाइपलाइनचा वापर करता आला असता मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांची पोट भरण्यासाठी अशा योजना आखल्या जातात, असे नदीम बेबन यांनी सांगितले. पाण्याच्या टाकीचे सुमारे १२ लाख ५० हजार रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले आहेत. मुळात नदीपात्रात बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीलाच आमचा आक्षेप असल्याचेही नदीम बेबन यांनी स्पष्ट केले. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रकाश माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.पूरजन्य परिस्थितीत टाकी कोसळण्याची शक्यताजून ते नोव्हेंबर या कालावधीत नदीच्या पात्रामध्ये पूरजन्य परिस्थिती असते. त्यामुळे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकी खालील जमिनीची धूप होते. त्याचा फटका नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला बसण्याची शक्यता आहे.पाण्याची टाकी बांधण्यासाठी परवानगी नाहीलोकवस्ती नदीच्या अलीकडे असताना पाण्याची टाकी मात्र नदी पात्राच्या पलीकडे बांधण्यात आली आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात टाकीसह पाइपलाइनही तुटण्याची शक्यता आहे. एकदा सर्व काही पाण्यात गेले की पुन्हा नव्याने योजना राबविण्यास अधिकारी, ठेकेदार तयार राहतील आणि सरकारचे लाखो रुपये पुन्हा पाण्यात घालवून स्वत:ची तुंबडी भरुन घेतील. तसेच नदीपात्रात पाण्याची टाकी बांधण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.