शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:35 IST

कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेची सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.

कर्जत : कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेची सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यातील सर्व सहा आरोग्य केंद्रांवर आणि त्या अंतर्गत असलेल्या ३२ आरोग्य उपकेंद्रे येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या केल्या जात नाहीत. त्यामागे अनेक कारणे असली तरी आपल्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व्हावी असे कोणत्याही वैद्यकीय अधिकारी अथवा आरोग्य विभाग यांना वाटत नाही. वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब नियोजनांतर्गत ‘हम दो, हमारे दो’ या धोरणाबाबत सरकारकडून जागृती करण्यात येत असली तरी तालुक्यातील आरोग्य विभागाकडून यात हरताळ फासण्यात येत आहे.गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण अंतर्गत शस्त्रक्रिया बंद आहेत. यात कळंब, मोहिली, कडाव, नेरळ, खांडस, आंबिवली या सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात अशी सेवा सुरू ठेवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने खासगी रु ग्णालयाचे फावते आहे.सरकारी रु ग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्यासाठी माफक खर्च येत असतो. कर्जत तालुक्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या होत नसल्याने शेवटी गोरगरीब रु ग्णांना खासगी रु ग्णालयाची पायरी चढावी लागत आहे.त्याचवेळी तेथे किमान १५,000 रु पयांपासून पुढे अधिक पैसे मोजावे लागत आहेत. ही बाब गोरगरीब कुटुंबांना परवडणारी नाही. त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा तालुक्यातील किमान एका प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हावी अशी सोय करण्याची गरज आहे. त्याकडे मागील दोन वर्षांपासून आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. कडाव, नेरळ, कळंब येथे नव्याने बांधकाम केल्याने तेथे शस्त्रक्रि या होत नाहीत तर आंबिवलीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने तेथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या होत नाहीत. त्याचवेळी मोहिली आणि खांडसमध्ये अपुऱ्या साधनसामग्री अभावी शस्त्रक्रि या होत नाहीत. हे सलग दोन वर्षे सुरू असल्याने खासगी रु ग्णालयामध्ये या शस्त्रक्रि या करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात..गोरगरीब महिलांना फॅमिली प्लॅनिंगचे आॅपरेशन करावे म्हणून अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांकडून मार्गदर्शन करण्यात येते. पण त्या शस्त्रक्रि या करण्यासाठी आरोग्य केंद्रात सोय आहे काय? याची माहिती त्यांना नाही.- जैतू पारधी, अध्यक्ष कर्जत तालुका आदिवासी संघटनाशासनाने हे काम पूर्वी टार्गेट म्हणून यशस्वीपणे राबविले आहे. मात्र, आता महिला स्वत:हून शस्त्रक्रि या करण्यासाठी पुढे येतात आणि ग्रामीण रुग्णालयात अशा शस्त्रक्रि या केल्या जात आहेत.- डॉ. श्याम पावरा, वैद्यकीय अधिकारी, कळंब