शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 08:04 IST

गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

श्रीवर्धन : गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याच सोन्याचा वापर करून गणपतीचा अर्धांग मुखवटा तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या दिवशी गणपतीचा अर्धांग मुखवटा प्रथमच सापडला त्या दिवशी आणि योगायोगाने उच्च न्यायालयाने आदेश पारित केले, त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. आता लवकरच गणपतीच्या अर्धांग मुखवट्याची दिवेआगर येथील गणेश मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना होणार असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.नगर जिल्ह्यातील फासेपारध्यांनी २३ मार्च २०१२ रोजी सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दरोड्यानंतर गणेशमूर्ती आगीवर वितळवली. प्राप्त माहितीनुसार, १४६६ ग्रॅम वजनाचे सोने दरोडेखोरांनी लंपास केले त्यानंतर जबरी चोरी, दरोडा आणि खून या विविध कलमांनुसार दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरोडेखोरांनी दरोड्यात पळविलेल्या सोन्यापैकी १३६१.४३ ग्रॅम सोने परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. दरोडेखोरांना पकडण्यात आल्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाने सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा खटला चालू असताना रायगड सत्र न्यायालयात सोने परत मिळावे म्हणून दिवेआगर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. परंतु सरकारने देवस्थानला दिलेला मुखवटाच अस्तित्वात राहिला नाही. सत्र न्यायालयाने सोने देवस्थान ट्रस्टला देण्यास नकार दिला आणि सोने सरकारजमा करण्याचा आदेश दिला.या गुन्ह्यातील आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात अपील दाखल केल्यामुळे या सोन्याचा वापर करता येणे शक्य नव्हते आणि त्यामुळे २०१२ पासून मुखवटा त्याच सोन्यापासून परत बनविला जावा या आशेवर सर्व भाविक प्रतीक्षेत होते. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी वर्धन अमित शेडगे यांनी उच्च न्यायालयातील सरकारी वकील श्रीकांत गावंड यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. गुन्ह्यानंतर परत मिळविण्यात आलेल्या सोन्यापासून मूळ गणपतीच्या अर्धांग मुखवट्यासारखा मुखवटा बनवून तो पुन्हा दिवेआगर येथील गणेश मंदिरात ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. ३१ मार्चला या अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर झाली.   जनतेला अपेक्षित असलेला निकाल लागलेला आहे. या प्रकरणी वारंवार पाठपुरवठा केलेला आहे. निश्चितच उच्च न्यायालयाच्या निकालाचे रायगडकरांच्या वतीने मी स्वागत करतो.- सुनील तटकरे, खासदार, रायगड उच्च न्यायालयाचा आजचा निकाल ही श्रींची इच्छा आहे. स्थानिक सर्व नागरिकांची इच्छा होती अगोदरचा मुखवटा पुन्हा मिळावा. त्या स्वरूपाचा निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे. माझा आनंद द्विगुणित झाला आहे.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगडउच्च न्यायालयाच्या निकालाचे हार्दिक स्वागत आहे. दिवेआगरमधील जनतेला अपेक्षित असलेला निकाल लागला आहे. - उदय बापट, सरपंच, दिवेआगर  

टॅग्स :RaigadरायगडCourtन्यायालय