शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

विभाग कार्यालयाला स्वच्छतेचे वावडे; सानपाड्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:14 IST

शहरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : स्वच्छता अभियान राबविणाºया महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीत स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. इमारतीचा जिना आणि टेरेसमध्ये अडगळीचे साहित्य ठेवण्यात आले असून, कचरा आणि धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे महापालिकेला कार्यालयांनाच स्वच्छतेचा विसर पडल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाºया स्वच्छ सर्वेक्षण २०२० या उपक्रमाच्या माध्यमातून शहरात विविध कामे सुरू आहेत. सर्वेक्षण स्पर्धेच्या निमित्ताने शहरात स्वच्छतेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये, तसेच देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई शहराचा पहिल्या तीन क्र मांकात समावेश व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनामार्फत विविध कामांना सुरु वातही करण्यात आली आहे. शहरात अभियान राबविताना स्वच्छतेची सवय नागरिकांनाही लागावी, यासाठी पालिकेच्या वतीने विविध स्तरावर स्वच्छतेच्या स्पर्धाही घेतल्या आहेत.तुर्भे येथील महापालिकेच्या विभाग कार्यलयाची दुरवस्था झाल्याने त्या इमारतीची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. डागडुजी काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विभाग कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या सानपाडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी विविध कामांसाठी येणाºया नागरिकांची कायम वर्दळ असते. मात्र इमारतीच्या आवारात अस्वच्छता पसरली आहे. जिन्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचली असून, कचराही पडला आहे. काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या इमारतीच्या जिन्यामध्ये पावसामुळे गळती झाले असून, भिंतींचा रंगही खराब झाला आहे. यामुळे इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.इमारतीच्या टेरेस भागात डेब्रिज, वाहनांच्या वापरात नसलेल्या टायरच्या ट्युब, भंगार लोखंडी रॅक आदी अडगळीचे साहित्य पडले असून शहरात स्वच्छतेसाठी लाखो रु पयांचा खर्च करणाºया विभाग कार्यालयाच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.