शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नागोठणेत दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: August 16, 2015 23:35 IST

भरधाव वेगात मोटारसायकलला कट मारल्याच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत शिवीगाळी व हाणामारी होण्याची घटना शनिवारी रात्री शहरात घडली.

नागोठणे : भरधाव वेगात मोटारसायकलला कट मारल्याच्या पार्श्वभूमीवर दोन गटांत शिवीगाळी व हाणामारी होण्याची घटना शनिवारी रात्री शहरात घडली. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे-पाटील आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि अधिकाऱ्यांनी सूत्रे आपल्या हाती घेत तातडीने तणावावर नियंत्रण आणल्याने परिस्थिती निवळली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून दंगल नियंत्रण कक्षाची तीन पथके येथे तैनात करण्यात आली असून दोन्ही गटांतील एकूण २१ जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील रिलायन्स चौकात शनिवारी मोटारसायकलला कट मारल्याचा राग धरून दोन गटांत शिवीगाळ व मारामारीचा प्रकार घडला होता. आपल्या गटातील तरु णांना मारले आहे याचा राग मनात धरून दुसऱ्या गटातील तरु णांनी पुन्हा एकदा वाद उकरून काढीत भांडणे व हाणामारी केली. याबाबतची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी तेथे येऊन परिस्थितीवर नियंत्रण आणत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे-पाटील आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांनी तातडीने रात्री शांतता समितीची बैठक घेऊन सर्व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले. रविवारी दुपारी अलिबाग येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. एल. पवार यांनी शहरात येऊन परिस्थितीची माहिती घेतली. तणाव पूर्णपणे निवळला तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून दंगल नियंत्रण कक्षाच्या तीन पथकांसह अलिबाग मुख्यालयासह इतर पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी विविध भागांत तैनात आहेत. दोन्ही गटांतील एकूण २१ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नकाव्हॉट्सअपवरील अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातात घेण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल झेंडे-पाटील यांनी दिला आहे. दंगल नियंत्रण पथक तैनातखबरदारीची उपाययोजना म्हणून दंगल नियंत्रण कक्षाच्या तीन पथकांसह अलिबाग मुख्यालयासह इतर पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी विविध भागांत तैनात आहेत.(वार्ताहर)