शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात ऑनलाइन योगाला नागरिकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 00:40 IST

कोरोनात उत्तम, सुदृढ आरोग्य हे रोगप्रतिकार करण्याची यशस्वी गुरुकिल्ली मानली जाते. योग, प्राणायाम, व्यायाम यातून शारीरिक व मानसिक सुदृढता वाढली जाते.

माणगाव :  २०२० मध्ये जागतिक कोरोना महामारीचे संकट जगावर पसरले. या काळात नागरिकांत सुदृढ आरोग्यासाठी जनजागृती झाली असून विविध ऑनलाईन योग प्रशिक्षणास प्रतिसाद मिळत असून यामध्ये उत्तम आरोग्याचा मंत्र देणाऱ्या योगासन प्रशिक्षणांना लोकांचा सहभाग वाढत आहे.कोरोनात उत्तम, सुदृढ आरोग्य हे रोगप्रतिकार करण्याची यशस्वी गुरुकिल्ली मानली जाते. योग, प्राणायाम, व्यायाम यातून शारीरिक व मानसिक सुदृढता वाढली जाते. प्राचीन संस्कृतीत योगाचे असलेले महत्त्व कोरोना काळात वृद्धिंगत होत आहे.विविध योग प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, मंडळे व योग शिक्षकांच्या साहाय्याने अनेक जण घरबसल्या आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्राधान्य देत असून सकाळी, संध्याकाळी व वेळेनुसार चालणाऱ्या या योग वर्गांना  महिला, कर्मचारी वर्ग व सर्वसामान्य नागरिकांची पसंती लाभत असून ऑनलाईन चालणाऱ्या या प्रशिक्षणासाठी योजक उत्तम तयारी करून योग वर्ग आयोजन करत असल्याचे दिसते आहे. अंबिका योग कुटीर ठाणे संचलित, शाखा पनवेलचा ऑनलाइन योग वर्ग वर्षभर चालू आहे. त्यामुळे आमचे या काळात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यास खूप मदत झाली. जर या महामारीतून बाहेर पडायचे असेल तर सातत्याने योग साधना करणे गरजेचे आहे.- शैला खडतर, योग अभ्यासिका, पनवेल‘करे योग रहे निरोग’ या उक्तीचा प्रत्यय व फायदा कोरोनाच्या संकटकाळात सर्व भारतीय नागरिकांना झाला आणि त्यापैकी मी एक. लाॅकडाऊनच्या काळात मी योगशिक्षक प्रशिक्षण घेतले आणि मग योगिंग-जाॅगिंग, सूर्यनमस्कार, प्राणायाम, आसने यांचे महत्त्व लक्षात येताच मोबाइलचा वेळ वजा करून मी योगासाठी वेळ देऊ लागले.- अपर्णा जंगम, योग शिक्षिका, माणगावकोरोना महामारी संकटात ऑनलाईन योग वर्गांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उत्तम आरोग्यासाठी व शारीरिक, मानसिक सुदृढता वाढविण्यासाठी योगाचे महत्त्व आहे. यामुळे या काळात योग वर्गांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.- हेमलता आखाडे, योग मार्गदर्शक, खोपोली