शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

By admin | Updated: September 28, 2016 02:48 IST

एका शेतकऱ्याच्या उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना करंजाडीच्या मंडल अधिकाऱ्याला, तो राहत असलेल्या महाड शहरातील फ्लॅटमध्येच

महाड : एका शेतकऱ्याच्या उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना करंजाडीच्या मंडल अधिकाऱ्याला, तो राहत असलेल्या महाड शहरातील फ्लॅटमध्येच अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बालाजी जाधव असे या पकडण्यात आलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. १५ दिवसांपूर्वीच बिरवाडी मंडल अधिकाऱ्याला चार हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनकडून पकडण्यात आलेले होते. ही घटना ताजी असतानाची १५ दिवसांतच महसूल विभागाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याचे कारनामे पुन्हा उघड झाले आहेत. महाड तालुक्यात कर्ले येथील जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्याचे नाव त्याच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी बालाजी जाधव यांनी त्या शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. त्यानंतर त्या शेतकऱ्याने विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. आज दुपारी मंडल अधिकारी राहत असलेल्या शहरातील दस्तुरी नाका येथील सिगल अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून बसलेल्या अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने या मंडल अधिकाऱ्याला पकडले.अ‍ॅन्टी करप्शन विभागाचे उपाधीक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यासिन इनामदार यांनी कारवाई केली.