शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टीवासीयांचा सिडकोवर धडक मोर्चा

By admin | Updated: June 10, 2017 01:17 IST

झोपड्या, गरजेपोटी बांधलेली घरे, फेरीवाले, धार्मिक स्थळे यांच्यावर सिडको, पालिका, एमआयडीसीकडून होत असलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : झोपड्या, गरजेपोटी बांधलेली घरे, फेरीवाले, धार्मिक स्थळे यांच्यावर सिडको, पालिका, एमआयडीसीकडून होत असलेल्या कारवाईमुळे त्रस्त, बेघर झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी पोलीस मुख्यालय आणि सिडकोवर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या माध्यमातून सिडको व्यवस्थापकीय संचालकांना लेखी निवेदन सादर केले. शासनाच्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०१५पूर्वीच्या अनधिकृत घरांना शासनाने अभय दिले असतानासुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा असंतोष मोर्चात सहभागी नागरिकांनी व्यक्त केला. रबाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी लाठीमार करून सामान बाहेर काढून बेघर करताना, सिडको अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची नाराजीही या वेळी व्यक्त करण्यात आली. रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून, सिडको व्यवस्थापकीय संचालक आणि पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. ३१ डिसेंबर २०१५पर्यंतच्या बांधकामांवर कारवाई न करण्याचे शासनाचे आदेश असतानाही त्याला केराची टोपली दाखवत सिडको प्रशासन पोलिसांच्या मदतीने या बांधकामांवर कारवाई करत असल्याची आणि गोरगरिबांवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. सिडकोची लॉटरी पद्धत बंद करा आणि सिडकोच्या जागेवर असलेल्या व कारवाई केलेल्या नागरिकांना अल्पदरात घरे उपलब्ध करून द्यावीत, अशीही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया या मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांनी केली.