शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोचे जागेवर अतिक्रमण? रांजणपाडा ग्रामस्थांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 12:59 IST

वीस वर्षांपासून रस्ता रखडला 

- वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : खारघरमधील वास्तू विहार ते तळोजाकडे जाणारा मागील रस्ता तब्बल वीस वर्षांपासून रखडला आहे. शहरातील रांजणपाडा गावाजवळील रस्त्याची एक मार्गिका कित्येक वर्षांपासून बंद आहे. या अर्धवट रस्त्यामुळे शेकडो अपघात याठिकाणी घडले आहेत. सिडकोची उदासीनता यामुळे समोर आली आहे. विशेष म्हणजे अतिक्रमणाच्या नावाखाली सिडको कारवाया करीत असताना या रस्त्यावर सिडकोने अतिक्रमण केल्याचा रांजणपाडा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

एकीकडे शहरात रातोरात उभारलेला कोपरा पुलामुळे सिडकोची तत्परता समोर आली आहे. मात्र, शहरात महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ असताना सिडको हा रस्ता बनविण्यास अपयशी ठरली आहे. याच मार्गावर रांजणपाडा गावातील स्मशानभूमी होती. सिडकोने ती जमीनदोस्त केली होती. ग्रामस्थांचा या गोष्टीला विरोध होता. ग्रामस्थ आणि सिडकोच्या वादात महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता कित्येक वर्षे अर्धवट राहिला आहे. या ठिकाणाहून जाताना वाहन चालकांना विरुद्ध दिशेने वाहनाला वळसा घेऊन पुढे वास्तू विहाराकडे जावे लागत आहे.सिडकोने हा रस्ता बांधताना संपादन झाली नसलेल्या जागेवरील स्मशानभूमी जबरदस्तीने पाडली. सात गुंठे जागेला पर्यायी जागा देऊन आमच्या गावासाठी नव्याने स्मशानभूमी उभारण्याची मागणी आम्ही करीत असल्याने रांजणपाडा येथील ग्रामस्थ गुरुनाथ चौधरी यांनी सांगितले. मात्र, सिडको असे न करता जबरदस्ती याठिकाणी रस्ता बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या दरम्यान सिडको अधिकाऱ्यांनी धाक दाखवून रस्ता बनविण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी डांबरीकरणासाठी खडी देखील टाकली होती. मात्र, ग्रामस्थ गुरुनाथ चौधरी यांनी उधळून लावला.

 अपघातांची मालिका सुरूच  दोन्ही बाजुला डांबरी रस्ता आणि मध्येच खड्डा अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.त्यामुळे वाहन चालकांना रात्रीच्या वेळेला या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होऊन अनेकजण याठिकाणी जखमी झाले आहेत.