शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सिडकोची कारवाई थांबवावी; उरणकरांचे पंतप्रधानांना साकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2023 19:43 IST

घरे अनधिकृत ठरवून सिडकोने नोटीसा देऊन तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

मधुकर ठाकूर

उरण : सिडकोने नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करु नये, गावठाण विस्तार करण्यात यावा, घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावी असे साकडे उरण येथील बालई ग्रामविकास परिषदेने थेट पंतप्रधानांना पत्राद्वारे घातले आहे. मागील ७० वर्षांपासून गावठाण विस्तारच झालेला नसल्याने नागरिकांनी नैसर्गिक गरजेपोटी आणि वाढत्या कुटूंबियांसाठी मालकीच्या जागेत उरण परिसरातील सिडकोच्या हद्दीत हजारो घरे उभारण्यात आली आहेत. मात्र आयुष्याची पुंजी लाऊन गरजेपोटी बांधलेली घरे अनधिकृत ठरवून सिडकोने नोटीसा देऊन तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

गरजेनुसार बांधलेल्या घरांमध्ये उरण तालुक्यातील बालई गावातील १०६ ग्रामस्थांचाही त्यामध्ये समावेश आहे. तलाठी, तहसिल, सिडको यांनी संबंधित ग्रामस्थांच्या घरांच्या नोंदी योग्य प्रकारे न घेतल्यानेच सिडकोने शेतकऱ्यांनी मालकीच्या जागेत बांधलेली घरे अनधिकृत ठरविली आहेत. मुख्य म्हणजे मागील ७० वर्षांपासून शासनाच्या अध्यादेशानंतरही गावठाण विस्तारच झालेला नाही. गावठाण विस्ताराच्या अध्यादेशाची अमंलबजावणी केली नसल्यानेच आमचीच नव्हे तर उरण परिसरातील नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली हजारो घरे सिडकोने अनधिकृत ठरविली असल्याचा आरोप बालई ग्रामविकास परिषदेचे सचिव रवींद्र चव्हाण यांनी माहिती देताना केला आहे.

सिडकोने घरे अनधिकृत ठरवुन कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर बालई गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून विस्तारित गावठाण नकाशा बनविला आहे. तसेच १०६ घर मालकांनी घरांचे नकाशे बनवले आहेत.लोकवर्गणी काढून विस्तारित गावठाणाचे नकाशा बनविला आहे. तसेच सिडकोकडून होणाऱ्या चुकीच्या कारवाई बाबत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय आणि मागासवर्गीय सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले तसेच उरण मावळचे  खासदार श्रीरंग बारणे यांना पत्र पाठवून न्यायाची मागणी केली आहे. मात्र त्यांच्याकडूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे घरे वाचविण्यासाठी आणि सिडकोने नैसर्गिक गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करु नये, गावठाण विस्तार करण्यात यावा, घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावी या मागणीसाठी उरण येथील बालई ग्रामविकास परिषदेने थेट पंतप्रधानांना पत्राद्वारे साकडे घातले आहे.

 

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरणcidcoसिडको