शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चौक ग्रामपंचायतीत पथ दिवे खरेदी घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:32 IST

चौक ग्रामपंचायतीने पथदिवे खरेदी प्रकरणात दुप्पट पैसे मोजून एलईडी दिवे खरेदी केल्या प्रकरणी माजी सरपंच व लता कोंडीलकर व ग्रामविकास अधिकरी अनंतकुमार सूळ जबाबदार असल्याचा अहवाल खालापूर पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना पाठविला आहे.

- अंकुश मोरे वावोशी : चौक ग्रामपंचायतीने पथदिवे खरेदी प्रकरणात दुप्पट पैसे मोजून एलईडी दिवे खरेदी केल्या प्रकरणी माजी सरपंच व लता कोंडीलकर व ग्रामविकास अधिकरी अनंतकुमार सूळ जबाबदार असल्याचा अहवाल खालापूर पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना पाठविला आहे. सावरोली ग्रामपंचायतीनंतर तालुक्यात चौक ग्रामपंचायतीचा गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे.चौक ग्रामपंचायतीने १५ मार्च २०१६ ला मान्यता प्राप्त नामांकित कंपनीचे विविध वॅटचे सुमारे ३०० एलईडी दिवे खरेदीसाठी आॅनलाइन पद्धतीने निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार मे.सोर्स वन ल्युमिनिरीज प्रा.लिमिटेड या कंपनीला टेंडर मिळाले होते. ४८ वॅटचे १०० एलईडी दिवे प्रतिनग ३९७५ रुपयांना खरेदी करण्यात आले व ३६ वॅटचे २०० एलईडी दिवे प्रतिनग ३१५० रुपये दराने खरेदी करण्यात आले. एकूण १०, २७, ५०० रुपये किमतीच्या मालाची खरेदी चौक ग्रामपंचायतीने केली होती. या खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामपंचायतीच्या सदस्या सुषमा गावडे यांनी सामाजिक कार्यकर्ते असलेले त्यांचे पती सुरेश गावडे यांच्या निदर्शनास आणले. मे. सोर्स वन ल्युमिनिरीज प्रा. लिमिटेडकडे दुकानाच्या नावे ४८ वॅट व ३६ वॅटचे एलईडी दिवे खरेदी केले असता ४८ वॅटचा एलईडी दिवा प्रतिनग २४३० रुपये तर ३६ वॅटचा एलईडी दिवा प्रतिनग १४७० रुपये दराने मिळाला. चौक ग्रामपंचायतीने सुमारे ४,९०,५०० रुपये जास्त दराने खरेदी केल्याचे सुरेश गावडे यांनी माहिती अधिकारातही उघड केले होते. याबाबत चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्त कोकण भवन यांच्याशी पत्रव्यवहार करत पुरावे सादर केले होते. विभागीय कोकण आयुक्तांनी सदर तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीत निविदा ८,६६,००० रुपये इतक्या रकमेची असतानाही मे. सोर्स वन ल्युमिनिरीज यांची १०,२७,००० इतकी जादा रकमेची निविदा मंजूर केल्याचे चौकशीत उघड झाले. याशिवाय उपसरपंच गणेश कदम यांची मासिक सभेसाठी सही नंतर घेण्यात आल्याची कबुली दिली. तत्कालीन सरपंच लता कोंडीलकर व ग्रामविकास अधिकारी अनंतकुमार सूळ जबाबदार असल्याचा ठपका गटविकास अधिकारी यांनी ठेवला.>ग्रामपंचायतीने खरेदीचे कोटेशन मंजूर करताना त्याच्या संबंधित सदस्यांना प्रती दिल्या नव्हत्या. त्याचप्रमाणे खरेदी वर्कआॅर्डरला जावक क्र मांक टाकलेला नाही. याबाबत पंचायत समिती खालापूर गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्र ार केली होती; परंतु एकतर्फी चौकशीत प्रकरण निकालात काढल्यामुळे मी मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त कोकण विभाग कोकण भवन यांच्या कार्यालयात लेखी तक्र ार अर्ज दिला होता. अखेर या प्रकरणात चौकशीत सत्य समोर आले असून, जनतेच्या पैशांची नासाडी करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार आहे.- सुषमा गावडे, सदस्या, चौक ग्रामपंचायत>सदरचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगड यांना पाठविला आहे. त्याबाबत पुढील कारवाईसाठी पाठपुरावा सुरू आहे.- संजय भोये, वरिष्ठ गटविकास अधिकारी, खालापूर पंचायत समिती