शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या निकषांमध्ये बदल

By admin | Updated: July 23, 2015 04:02 IST

स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना सरकारसह प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे. २०१९ सालापर्यंत ग्रामपंचायती

आविष्कार देसाई, अलिबागस्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना सरकारसह प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे. २०१९ सालापर्यंत ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे स्वप्न सरकारला दिसेनासे झाले आहे. त्यामुळे सरकारने हागणदारीमुक्तीचे निकष बदलून वेळेआधीच पल्ला गाठण्याची एक नामी शक्कल लढविली असल्याचे समोर आले आहे.आघाडी सरकारच्या मूळ योजनेचे नाव बदलून स्वच्छ भारत मिशन असे नामकरण भाजपा सरकारने केले आहे. तोच कार्यक्रम पुढे सुरू होता, मात्र विविध ग्रामपंचायती आणि विशेष करून नागरिक अजूनही वैयक्तिक शौचालयांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करीत नसल्याचे वेळोवेळी समोर येत आहे. पेयजल आणि स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा वेळ, पैसा खर्च होतो, परंतु त्यातून अपेक्षित निकाल मिळत नाही. वैयक्तिक शौचालयाची उभारणी करणे हे बंधनकारक नसून हा कार्यक्रम ऐच्छिक स्वरूपाचा असल्याने तो कोणावर लादता येत नाही.गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी केवळ वैयक्तिक शौचालयांचा विचार केला, तर हजारो शौचालयांचे बांधकाम करावे लागणार असून हे सरकारसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे अशा बऱ्याच अडचणी येत असल्याचे सरकारच्या आता लक्षात आले आहे. या अडचणींवर लवकर मात केली नाही, तर २०१९ सालापर्यंतचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नाही. यासाठीच सरकारने या हागणदारीमुक्त गाव मिशनच्या निकषात १७ जून २०१५च्या पत्रानुसार काही बदल केले आहेत. याची अंमलबजावणी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात मात्र कोणतेच बदल केलेले नाहीत. त्यामुळे ते बांधण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरूच राहणार आहेत. तसेच पुरस्कारांमध्ये बदल केलेले नाहीत. रायगड जिल्ह्यात ८२४ ग्रामपंचायती आहेत. पैकी ४७१ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. ३५३ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी असून २६५ ग्रामपंचायती नवीन आणि जुन्या निकषाप्रमाणे २०१५ पर्यंत निर्मल करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे.