शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी प्रकरणाचा लागला छडा

By admin | Updated: May 28, 2016 02:35 IST

खोपोली शहरात १५ दिवसांपूर्वी घरात सात तोळे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेची खोपोली पोलीस ठाण्यात नोंद होताच पोलिसांनी तपासाची

खालापूर : खोपोली शहरात १५ दिवसांपूर्वी घरात सात तोळे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेची खोपोली पोलीस ठाण्यात नोंद होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत असताना या चोरी झालेल्या घरातील अल्पवयीन मुलगीच गायब असल्याचे समोर आले. या चोरीच्या घटनेच्या माध्यमातून मुलीपर्यंत पोचण्याचा मार्ग मिळाल्याने या घटनेच्या तपासाअंती या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच सोने विकत घेणाऱ्या खोपोलीतील एका सोनाराच्या भावाला अटक केली असून, चारही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.५ ते ६ मे रोजी प्रतिभा कॉम्प्लेस या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलाची परीक्षा असल्याने ते कुटुंब मुलासोबत बाहेर गावी गेले असताना त्याच्या घरातील सात तोळे दागिने चोरीला गेल्याची खोपोली पोलिसांत नोंद करण्यात आली होती. या घटनेचा तपास सुरू असताना त्याच घरातील अल्पवयीन मुलगी रविवारी गायब असल्याची तक्र ार नोंदविण्यासाठी तिचे आईवडील पोलीस ठाण्यात मुलीला कोणी तरी फूस लावू पळवून नेल्याची तक्र ार दिली असल्याने या घटनेत काही तरी वेगळेच असल्याचे समोर आले. या घटनेचा पोलीस निरीक्षक एस. एम. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह निरीक्षक आश्विनी बावचे, पो. हे. कॉ. तुकाराम महाडीक, ए. एस. आय राठोड, पो. ह. खराडे व भडाले यांनी तपासाची केला मुलगीच या घटनेत सामील असल्याचे समोर आले. या मुलीने आपला प्रियकर प्रतीक बहाडकर (रा. यशवंतनगर) याला मोटारसायकल घेण्यासाठी ते सोने दिले. ते सोने सोनाराला विकण्यासाठी व मदतीसाठी आकाश सुरेंद्र प्रसाद सिंग (रा. खोपोली कॅटरिंग) व हृषीकेश मिहिलेश मिश्रा (रा. विहारी, खोपोली) हेही या गुन्ह्यात सामील असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी या तिघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता हे दागिने खोपोलीतील एका सोनाराला विकल्याचे चौकशीत समजले. खोपोलीतील एका सोनाराचा भाऊ कुशाल जैन याला ताब्यात घेऊन चौकशीत दोषी आढळल्याने अटक केले आहे.तक्रार दाखल५ ते ६ मे रोजी प्रतिभा कॉम्प्लेस या इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील मुलाची परीक्षा असल्याने ते कुटुंब मुलासोबत बाहेरगावी गेले असताना त्याच्या घरातील सात तोळे दागिने चोरीला गेल्याची खोपोली पोलिसांत नोंद करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी मुली गायब झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी दिली होती.