शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन चिघळण्याची शक्यता; मागण्या मान्य न केल्यास आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:01 IST

पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकाच वेळी तीन आंदोलने जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने अद्यापही आंदोलकांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा न काढल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

अलिबाग : पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकाच वेळी तीन आंदोलने जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने अद्यापही आंदोलकांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा न काढल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. नदी बचाव आंदोलनाचा शुक्रवारी, २८वा दिवस आहे, तर लक्षवेधी उपोषणाचा १९वा आणि बेमुदत उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने आंदोलकांकडून प्रशासनासह लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त होत आहे. आदिवासी समाजाच्या मागण्यांबाबत योग्य विचार न केल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे.पेण तालुुक्यातील मुंगेशी गौण खनिज परवाना रद्द करावा, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या प्रमुख मागणीसाठी मुंगोशी-बेलवडे आदिवासीवाड्या संघर्ष समितीचे अध्यक्ष हरीष बेकावडे यांनी आंदोलन छेडले आहे. चार दिवसांपूर्वी पेण तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले होते. त्यानंतर शुक्रवारपासून ते समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्याचप्रमाणे पेण तहसीलदार येथील उपोषणचा १९वा दिवस आहे. तेथेही त्यांचे समर्थक उपोषण पुढे नेत आहेत. तर नदीच्या पात्रातील आंदोलनाला २८ दिवस झाले आहेत. गौण खनिजाचे उत्खनन केल्याने पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. दिवसाला ६० ब्रास खडींचे उत्खनन करण्यात येत आहे. संबंधितांनी उत्खनन करण्यासाठी फक्त प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्याला परवाना नसतानाही अर्जदाराने उत्खनन सुरू केले असल्याकडे बेकावडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, प्रशासनाकडून डोळेझाक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तेथील खडी क्रशर प्लांट बंद करण्याचे आदेश पेण तहसीलदार यांनी दिले. त्यानंतर प्रशासनाने विदूर तांडेल याच्या मालकीच्या जागेत निकेश तांडेल याला परवाना देऊन आदिवासी समाजाच्या भावनांवर मीठ चोळल्याची भावना आंदोलकांची झाली आहे. त्यामुळे तातडीने परवाना रद्द करावा, खोटे दाखले देणारा मंडळ अधिकारी डी. डी. निकम याला तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.- पेण येथील आंदोलकांची भेट घेण्यासाठी अलिबागचे प्रातांधिकारी, पेण तहसीलदार गेले होते. मात्र, त्यावर योग्य तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे बेकावडे यांनी स्पष्ट केले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासनातील अधिकारी फिरकला नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raigadरायगड