शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

अठरा वर्षांवरील साडेचार लाख नागरिकांना लस देण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 23:53 IST

नवी मुंबई पालिकेची तयारी पूर्ण : लस उपलब्ध होत नसल्याने पडतोय खंड

 लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शासनाने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचे जाहीर केले आहे. नवी मुंबईमध्ये साडेचार लाख नागरिकांना लस घेता येणार आहे.

महानगरपालिकेने त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे; परंतु शासनाकडून लस वेळेत मिळत नसल्याने ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस पुरविण्यात अडथळे येत असून, अशीच स्थिती राहिली तर सर्व प्रौढांना लस कशी द्यायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात ५२ लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. प्रतिदिन ७ हजार पेक्षा जास्त नागरिकांना लस देता येईल, अशी यंत्रणा तयार केली आहे. भविष्यात प्रतिदिन १५ हजार नागरिकांना लस देता येईल, अशी यंत्रणा लवकरच तयार केली जाणार आहे.

शहरात १८ वर्षांवरील साडेचार लाख नागरिकांना लस देण्यासाठी प्रशासकीय तयारी असली तरी या सर्वांसाठी लस उपलब्ध होणार का, असा प्रश्न आहे. सद्य:स्थितीमध्ये वारंवार लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. आहे तीच केंद्रे लस नसल्याने बंद करावी लागत असून, १ मे पासून सर्व प्रौढांना लस कशी द्यायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. 

लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणारशहरात सद्य:स्थितीमध्ये ५२ लसीकरण केंद्रे आहेत. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार असल्यामुळे अजून  केंद्र वाढविण्यात येणार आहेत. प्रतिदिन १५ हजार नागरिकांना लस देता येईल, असे नियोजन महानगरपालिकेने केले असून, त्यासाठी नवीन केंद्रे वाढविण्याचीही तयारी केली आहे.

ज्येष्ठांचाही सहभाग वाढलालसीकरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग समाधानकारक आहे. शहरात आतापर्यंत ५८२५९ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. १०४९५ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. वाशीमधील एक ९९ वर्षांच्या आजीबाईंनीही लस घेतली आहे. लसीचा तुटवडा दूर करण्याची मागणीही अनेक ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. 

४५ वर्षांवरील ७४ हजार नागरिकांनी घेतली लसशहरात ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांचा लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ७४५८३ जणांनी लस घेतली आहे. लसीचा साठा संपल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही लस घेता येत नाही. केंद्रावरून अनेकांना परत जावे लागत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. 

३७ हजार नागरिकांनी घेतला दुसरा डोसशहरात आतापर्यंत १ लाख ९० हजार ५६३ जणांनी पहिला डोस घेतला  आहे. यापैकी ३८९२५ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. १५२७५ आरोग्य कर्मचारी, ८१७७ फ्रंटलाइन वर्कर, ३९७८ सहव्याधीग्रस्त, १०४९५ ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत दुसरा डोस घेतला आहे. 

पुन्हा संपला साठा nमहानगरपालिकेला मंगळवारी लसीचे  फक्त तीन हजार डाेस मिळाले होते. बुधवारी दुपारी लसीचे डोस संपल्यामुळे अनेक केंद्रे बंद करावी लागली आहेत. nनवीन डोस आले तरच गुरुवारी लसीकरण सुरू करता येणार आहे. लस मिळाली नाही तर लसीकरण बंदच राहणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या