शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:42 IST

स्वच्छतेमध्ये अडथळा : वाहने उचलण्यासाठी महापालिकेकडील यंत्रणा अपुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छता अभियानादरम्यान रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे स्वच्छता अभियानावरही परिणाम होत आहे. रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा अपुरी पडत असून त्यासाठी ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने उचलण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. प्रशासनानेही वाहनांना नेाटीस लावणे व ती उचलून नेण्यास सुरुवात केली आहे. परंतु बेवारस वाहनांची संख्या खूप असल्यामुळे ही वाहने ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडील जागा अपुरी पडत असून ती घेऊन जाण्यासाठीची यंत्रणाही अपुरी पडत आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये प्रत्येक नोडमध्ये नोटीस चिकटवल्याची मुदत संपल्यानंतरही अद्याप अनेक वाहने उचलण्यात आलेली नाहीत. एक महिन्यापूर्वी तुर्भे वाशी रोडवर कांदा मार्केटच्या जवळील पेट्रोल पंपासमोर एका रिक्षाला आग लागली होती. एक महिना झाल्यानंतरही रिक्षाचा सांगाडा अद्याप उचलण्यात आलेला नाही. पामबीच रोडवरही बेलापूरकडून वाशीकडे जाणाऱ्या मार्गीकेवर सारसोळेजवळ एक कार आग लागून खाक झाली आहे. अनेक दिवसांपासून कारचा सांगाडा तसाच पडून आहे.

शहरातील प्रत्येक नोडमध्ये वापर होत नसलेली वाहने धूळखात पडून आहेत. या वाहनांमुळे रस्त्याची साफसफाईही करता येत नाही. या वाहनांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याचे चित्र पाहावयास मिळते. स्वच्छता अभियानानिमित्त महानगरपालिकेने नियमित रस्ते सफाई, रोडच्या बाजूच्या संरक्षण भिंतींची रंगरंगोटी व इतर सुशोभीकरणाची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. परंतु बेवारस वाहनांमुळे शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे.

ठोस यंत्रणा हवीशहरातील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. नियमाप्रमाणे वाहनांवर नोटीय चिकटवणे, नोटीस संपल्यानंतर ती वाहने उचलून नेणे, उचलण्यात आलेली वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ व योग्य मुदतीनंतर त्यांचा लिलाव करणे याविषयी नियमाप्रमाणे व वेेळेत कार्यवाही झाली तरच हा प्रश्न मिळणार आहे. अन्यथा रोडवरील बेवारस वाहनांचा कचरा दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे.