शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चाफेवाडीत 70 आदिवासी कुटुंबांनी श्रमदानातून बंधाऱ्यात साठवले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:56 IST

६० मीटरचा बंधारा : आठ झडपा केल्या बंद; पाणीटंचाईची समस्या होणार दूर

n विजय मांडेकर्जत : पाणी समस्येवर मात करण्यासाठी चाफेवाडी आदिवासी वाडीवरील ७० कुटुंबांनी श्रमदान केले. आदिवासी ग्रामस्थांनी लहान मुलांसह एकत्र येत ६० मीटर लांबीच्या बंधाऱ्याच्या आठ झडपा बंद करून घेतल्या. दिवसभर केलेल्या श्रमदानातून त्या बंधाऱ्यात आणि परिसरात पाणीच पाणी दिसून येत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार नसल्याचे दिसून येते.खांडस ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी, पादिरवाडी, पेटारवाडी, घुटेवाडी या ठिकाणी पिण्याचे पाणी मे आणि जून महिन्यात जमिनीत घुसून शोधावे लागते, कारण चाफेवाडीची उपनदी उन्हाळ्यात कोरडी पडते. मग डवरे खोदले जातात आणि त्यातून घरी पाणी नेले जाते. त्या भागात एक किलोमीटर अंतरात किमान चार ठिकाणी कोल्हापूर टाइपचे सिमेंट बंधारे आहेत. त्यातील दोन बंधारे तर २०१७ मध्ये किमान ५० लाख रुपये खर्च करून बांधले आहेत. मात्र नवीन दोन आणि जुने दोन असे सर्व सिमेंट बंधारे हे पाणी गळतीमुळे कुचकामी ठरत आहेत. पाणी जमिनीखालून वाहून जात असल्याने मग जानेवारी उजाडला की पाणी राहत नाही .फेब्रुवारी महिना सुरू झाला की येथील चाफेवाडीमधील आदिवासी लोक कोरड्या नदीमध्ये खोदलेल्या डवऱ्यामधून पाणी नेऊ शकत होते. मात्र जून महिन्यात नियोजित काळात पाऊस आला नसल्याने मग डवरे हे जमिनीमध्ये खोलवर पाणी शोधण्यासाठी खोदले जातात. त्या वेळी नदीमधील खडक असलेल्या ठिकाणी पाण्याचे झरे आढळून येत असल्याने मग ते पाणी शोधण्यासाठी आदिवासी लोक पाच फूट सहा फूट खोल पाणी शोधत खड्डे खोदत असतात. पोश्री आणि चिल्लार नदीमध्ये आणि त्यांच्या उपनद्यांमध्ये सध्या असे चित्र दिसत आहे. ग्रामस्थ हे चार-पाच जण मिळून असे खोल खड्डे खोदून पाणी शोधून ठेवतात आणि मग आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी चार चार तास बसून पाणी गोळा करतात.पाणीटंचाईची ही समस्या काही काळासाठी दूर करण्यासाठी १० डिसेंबर रोजी चाफेवाडीमधील सर्व ७० घरांतील प्रत्येकी एक व्यक्ती उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या नदीवर एकत्र आले होते. सकाळपासून सुरू झालेल्या श्रमदानामुळे साधारण ६० मीटर लांबीचा आणि आठ दरवाजे असलेला सिमेंट बंधारा सायंकाळी पाण्याने भरून गेला. ४०-४५ महिला, सोबत ५० हून अधिक पुरुष आणि ३५-४० लहान मुले यांच्यामुळे चाफेवाडीच्या पायथ्याशी असलेल्या नदीवर गर्दी दिसून येत होती. ग्रामस्थांनी दिवसभर तेथेच थांबून बंधाऱ्याच्या आठ दरवाजांमधील पाणी जाण्याच्या वाटा बंद करून टाकल्या. हे श्रमदान आदिवासी वाडीमधील तरुणवर्गाने दुंदा हिंदोळा, नीलेश मारुती खंडवी, लहू मालू खंडवी, योगेश खंडवी, पोलीस पाटील किसन सीताराम खंडवी, भाऊ हिंदोळा यांच्या पुढाकाराने यशस्वी झाला.   सिमेंट बंधाऱ्यात साचले १०-१२ फूट पाणी चाफेवाडीमधील आदिवासी कुटुंबांनी एकत्र येत केलेल्या श्रमदानामुळे जानेवारी महिन्यात कोरड्या पडणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यात किमान १०-१२ फूट पाणी साचून राहिले आहे. पाण्याची पातळी लक्षात घेता चाफेवाडी ग्रामस्थांना उन्हाळ्यात लवकर नदीमध्ये डवरे खोदण्याची वेळ येणार नाही.वाडीमधील महिलांना मार्च महिना सुरू झाला की कोरड्या पडणाऱ्या नदीत खड्डे खोदावे लागतात ही बाब लक्षात घेऊन आम्ही कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना नदीमध्ये एक जागा दाखवली असून तेथे विहीर मंजूर करण्याची विनंती केली आहे. त्या ठिकाणी मे महिन्यात पाच फूट खोदले तरी पाणी असते.- दुंदा हिंदोळा, ग्रामस्थ