शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’च्या निधीसाठी हात सैल करावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:23 IST

आदिती तटकरे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : मागील वर्षी 'खेलो इंडिया'च्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने अव्वल स्थान पटकाविले होते. केंद्र सरकारने या वर्षी महाराष्ट्र राज्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी क्रीडा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथे केली. खोपोली येथे कुस्ती महर्षी भाऊ कुंभार संकुलाचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पार पडले. त्यावेळी प्रसंगी त्या बोलत होत्या.केंद्र सरकारने २०१७-१८ च्या प्रस्तावांनाच मान्यता देऊ, असे राज्य सरकारला कळविले आहे. राज्यात मागील काही वर्षांत चांगले खेळाडू निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्राकडून ''खेलो इंडिया''अंतर्गत महाराष्ट्र राज्याला चांगला निधी मिळावा, महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त प्रस्तावांना मंजुरी मिळावी, यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्र सरकारकडे भक्कम बाजू मांडून पाठपुरावा करावा, अशी विनंती तटकरे यांनी केली.राज्यात इतर महसुली विभागांचे क्रीडा संकुल निर्माण हाेत आहेत. मात्र कोकण विभागाचे क्रीडा संकुल नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे कोकण विभागीय क्रीडा संकुलाला मंजूरी दिली आहे. तीस एकर जागा हस्तांतरितही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तालुकास्तरीय क्रीडा संकुलासाठी या पूर्वीचे सरकार एक कोटी रुपये देत होते, त्या निधीमध्ये भरीव तरतूद करीत या वर्षापासून पाच कोटी रुपयांचा निधी तालुका क्रीडा संकुलासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली. क्रीडा व युवक कल्याण विभाग स्वतंत्र करण्याच्या मागणीलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, खोपोली नगराध्यक्षा सुमन औसरमल स्थानिक खेळाडू आदी मान्यवर उपस्थित होते.

भाऊसाहेब कुंभार यांचे कुस्तीसाठी योगदान - थोरवेn मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कुस्ती महर्षी खाशाबा जाधव व खोपोलीचे भाग्यविधाते भाऊ कुंभार यांच्या कार्याचा गौरव करीत भाऊ कुंभार यांच्याबरोबर माझे व्यक्तीगत मित्रत्वाचे संबंध होते आणि आमची अनेकदा भेटही झाली असल्याचे सांगितले. n आमदार महेंद्र थोरवे यांनी भाऊसाहेब कुंभार यांनी आयुष्याचे योगदान रायगडातील कुस्तीसाठी दिले, त्यांच्या कार्यातून महाराष्ट्र पातळीवर मोठमोठे कुस्तीपटू तयार झाल्याचे सांगितले.